Monday, August 17, 2026
HomeTop Newsजिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शनाचा दिव्यांगानी लाभ घ्यावा -माया...

जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शनाचा दिव्यांगानी लाभ घ्यावा -माया देसाई : कुडाळ येथील मनमंदिर मतिमंद मुलांच्या कार्यशाळेत विधी सेवा शिबिर संपन्न

कुडाळ : दिव्यांगांसाठी कायदेविषयक मदत ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष त्यांच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे, जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शनाचा दिव्यांगानी लाभ घ्यावा असे प्रतिपादन  सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या अधीक्षक  माया देसाई यांनी केले. यावेळी त्यांनी  अशा विधी सेवा शिबिरांमुळे कायद्याची भीती न राहता नागरिकांमध्ये हक्कांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होत असल्याचेही स्पष्ट केले.
           दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची, कायदेशीर तरतुदींची तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने कुडाळ येथील मनमंदिर मतिमंद मुलांची कार्यशाळा येथे विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरास विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
       शिबिराच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी उपस्थितांना मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन, कायदेशीर मदत मिळण्याची प्रक्रिया, दिव्यांग व्यक्तींचे अधिकार, पालकांचे कायदेशीर हक्क तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी याबाबत माहिती दिली.
         या वेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव
प्रियदर्शनी अरविंद वाघमारे, लिपिक अनिकेत कदम ,सागर भोसले ,  मनमंदिर मतिमंद संस्थेचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष संजय शिंदे, शिक्षका वर्षा कांबळे,मंगल कांबळे,सागर कोळी आदी शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.
          दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केवळ शैक्षणिक मदत पुरेशी नसून त्यांना त्यांच्या अधिकारांची माहिती असणे आवश्यक आहे. कायद्याने दिलेले अधिकार, सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अन्याय झाल्यास उपलब्ध असलेली कायदेशीर मदत याची जाणीव प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे यावेळी सचिव प्रियदर्शनी वाघमारे यांनी सांगितले.
           यावेळी देसाई व वाघमारे यांनी शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. दिव्यांग प्रमाणपत्र, शासकीय सवलती व योजना, शिक्षणातील हक्क, पालकांना उपलब्ध असणारी मदत आणि कायदेशीर अडचणी उद्भवल्यास विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळणारी विनामूल्य मदत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे मनमंदिर मतिमंद मुलांच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष संजय शिंदे यांनी  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.



 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page