ग्रामपंचायत सदस्य दिनेश किर्वे यांच्या तर्फे कुडाळ येथे मास्क व सँनिटायझर वाटप

सूर्यकांत जोशी कुडाळ – ग्रामपंचायत सदस्य दिनेश किर्वे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या हँण्ड सँनिटायझर व मास्कचे कुडाळ येथे वाटप केले. किर्वे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
कोरोना संसर्गा पासुन सर्व सामान्य जनतेचे रक्षण व्हावे यासाठी आपला जीवधोक्यात घालुन कुडाळ येथे कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस, पत्रकार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका ,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच तानाजी वाँर्ड मधील प्रत्येक घरात तसेच गावातील अन्य गरीब व गरजुंना दिनेश किर्वे यांच्या तर्फे सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वामिनी चव्हाणके,नथुराम कदम,तसेच किर्वे यांचा मित्र परिवारातील उपस्थित होते.
याबाबत बोलताना दिनेश किर्वे म्हणाले, तानाजी वार्ड मधील जनतेने विश्वासाने ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी केले होते.आज कोरोना विषाणूचे संकट आपल्या दारात येऊन ठेपले आहे. यापरिस्थित येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करण्याचे कर्तव्य भावनेतून सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जनतेने साबणाने हात वेळोवेळी धुवावेत, तसेच बाहेर जाताना हँण्ड सँनिटायझर व मास्कचा वापर करावा. अनावश्यक बाहेर फिरु नये असे आवाहन किर्वे यांनी केले आहे.