Skip to content

बुधवारी जावलीतील पाच जण कोरोना संक्रमित

बातमी शेयर करा :-

जावली कोरोना ६८/४  

बुधवारी जावलीतील  पाच जण कोरोना संक्रमित

      जावली कोरोना ६८/४  

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात बुधवारी सकाळी ओझरे येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला.तर रात्री उशीरा भणंग येथील 21 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला, धोंडेवाडी येथील 63 पुरुष, 57 वर्षीय पुरुष अशा चौघांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला. अशा प्रकारे बुधवारी एकूण पाच जणांचा अहवाल  कोरोना पाँसिटीव्ह आला असून जावलीतील कोरोना रूग्णांची संख्या ६८ आहे.तर चार जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

            या सर्व पाचही रुग्ण मुंबई हुन आलेले आहेत.प्रशासन  आणि ग्रामपातळीवरील दक्षता समितीच्या कर्तव्यदक्षतेमुळे आज पर्यंत कोणत्याही गावात कोरोना संक्रमित रुग्णांची साखळी तयार झाली नाही. तहसीलदार शरद पाटील आणि गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग ,अंगणवाडी सेविका, आशा सेविका, व ग्रामदक्षता समिती असे चांगले टीमवर्क सुरू आहे. बाहेरील जिल्हयातून येणाऱ्यांना गावात येताच होमक्वारंटाईनचा केले जात असल्याने संसर्ग रोखणे शक्य झाले आहे.

                असे असले तरीही तालुक्यातील बाजारपेठांतील गर्दीवर आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मिळालेली सवलत म्हणजे आता कोरोनाचा धोका नाही असाच समज लोकांनी करून घेतलाय.सोशल डिस्टेन्सींग तर नावालाही कोणी पाळत नाही तर गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावता मिरवणारे अनेक जण आहेत. मास्क न वापरणारे इतरांना अनाहूत सल्ले देत आहेत. याकडे लक्ष वेधून नियम व कायदा मोडणारांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे.

         गेले दोन महिने जरी कडेकोट बंद पाळला असला तरीही तो कोरोना वरील उपचार नव्हता. सामाजिक अंतराचे भान ठेऊन व्यवहार करणे व मास्क वापरणे एवढेच फक्त उपाय आहेत हे जनतेने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!