जावलीत रविवारी चार कोरोना रुग्णांची भर, बाजारपेठा हाऊस फुल्ल ; लोकांचा बेजबाबदार पणा घातकच

जावली तालुक्यात रविवारी चार कोरोना रुग्णांची भर ; बाजारपेठा हाऊस फुल्ल.लोकाचा बेजबाबदार पणा घातकच.
सूर्यकांत जोशी कुडाळ :- जावली तालुक्यातील प्रभुचीवाडी येथील तीन तर मुनावळे येथील एक अशा चार कोरोना पाँझिटीव्ह रूग्णांची भर पडली .त्यामुळे तालुक्यातील एकूण पाँझिटीव्ह रुग्णांची संख्या एकसष्ठवर पोहचली आहे. जावली तालुक्यातील प्रशासनाच्या गतीमान हालचालींमुळे कोरोनाचा सामाजिक संसर्ग होऊ शकला . बाधित रुग्ण हे मुंबई हुन आलेले व त्यांच्या घरातील च आहेत. परंतु बाधिताचा आकडा काहीसा काळजी वाढवणारा आहे.
मुंबई चाँदवली येथून दि.२४ मे रोजी आलेल्या 52 वर्षीय व्यक्ति पाठोपाठ त्यांची पत्नी वय 50 मुलगा 28 मुलगा 26 या संपर्कातील 3 जणांचा अहवाल काल रात्रि उशिरा पॉझिटिव्हआल्याने तालुक्यात खळबळ माजली. रात्री अगोदर फक्त तालुक्यात चार पाँझिटीव्ह एवढाच मेसेज समजला.परंतु गाव कोणते याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. यापूर्वी सायगाव २,मोरघर ४, बेलावडे ४ तर आता प्रभुचिवाड़ी ४ असे ऐकून १४ मुंबई रिटर्न कोरोनाबाधीत रुग्ण येथे झाल्याने जावली तालुक्यातील मुख्य बाजार पेठेचे ठिकाण असणाऱ्या सायगाव आनेवाड़ी विभागात लोक कोरोनाच्या दहशतीखाली आहेत.सुदैवाने बेलावडे ची साखळी वाढली नाही.या विभागातील सायगांव व मोरघर येथील सहा कोरोना रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. तर बेलावडे येथील एक कोरोना ने बळी गेला आहे.
ग्रामीण भागातील गावागावात दक्षता कमिट्या अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत.दरम्यान बाधित कुटुंबाच्या लो रिस्क संपर्कात असणारे अजूनही 18 जन असल्याने व हाय रिस्क संपर्कातील आणखी एकाचा अहवाल येणे बाकी आहे, आरोग्य विभाग ,आशा स्वयंसेविका यांच्यासह पोलिस पाटील व ग्रामस्तरीय कमिटी च्या माध्यमातून टीम तयार करून बाहेरुन येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांची कसून माहिती घेत आहेत.
अन्लाँक एक मध्ये मिळालेल्या सवलती मुळे तालुक्यातील बाजार पेठांत गर्दी होत आहे. तालुक्यातील सोळा गावे कन्टेमेंट झाली असताना लोक अजूनही कोरोनाचे संभाव्य संकट गांभीर्याने घेत नाहीत. मास्क चा वापर आणि सोशल डिस्टेन्सींग हाच कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाय आहे. पण कोणीही जबाबदारीने वागत नाही. आणि हाच बेजबाबदार पणा अंगलट येण्याची दाट शक्यता आहे.