Skip to content

जावलीत रविवारी तीन जण कोरोना पाँसिटीव्ह

बातमी शेयर करा :-

जावलीत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले.

 आज तीन जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोना मुक्तीच्या दिशेने घोडदौड करत असलेल्या जावली तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आज रविवारी सकाळी तालुक्यात तिन कोरोना पाँसिटीव्ह रूग्णांची भर पडली आहे.

          यामध्ये केडंबे येथील ६५ वर्षीय पुरुष, म्हाते खूर्द येथील  ५४ वर्षीय महिला व ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रुग्ण बाहेरून आलेले आहेत.रूग्णानी आपले पूर्वीचे तसेच कोणत्याही आजाराची लक्षणे लपवून ठेवू नयेत. वेळीच उपचार घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. अन्यथा हा गाफील पणा आपल्या स्वतःच्या जीवावर बेतू शकतो तसेच यामुळे आपले कुटुंब व परिसरातील लोक अडचणीत येऊ शकतात. तरी यापुढे लोकांनी अधिक सतर्क रहावे असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले आहे. 

      आतापर्यंत तालुक्यातील एकूण रुग्ण  संख्या ८१ झाली असून सात जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.तालुक्यातील लोकांनी घेतलेल्या खबरदारी मुळे स्थानिक जावली तील लोक कोरोना संक्रमना पासून आज पर्यंत सुरक्षित राहिले आहेत.परंतू मेढा व कुडाळ येथील बाजारपेठेत कोरोना बाबत कोणतेही गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. सोशल डिस्टेन्सींगचा पूर्ण फज्जाच उडाला असून सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के लोक मास्क शिवाय बाजारात फिरत आहेत.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!