Skip to content

आमदार शशिकांत शिंदे यांचा झंझावात जावलीत अजुनही कायम

बातमी शेयर करा :-

राज्यात पक्ष वाढविण्यासाठी ताकद पणाला लावणार- आ. शशिकांत शिंदे

जावली तालुक्यात आमदार शिंदे यांचे उत्स्फूर्त स्वागत

कुडाळ – राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन राज्यात पक्षाच्या मजबूतीसाठी ताकद पणाला लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्या नंतर आपल्या ग्रामदैवत हुमजाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या आमदार शशिकांत शिंदे हुमगांव त्यांच्या जन्मगावी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी तालुक्यातील जनतेने जागोजागी त्यांचे उत्स्फूर्त  स्वागत केले.

               सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून तो यापुढेही अभेद्य च राहील. जिल्ह्याची राजकीय समिकरणे आता पून्हा बदलली असून झालेली पडछड दुरुस्त करुन कार्यकर्ते पून्हा जोमाने कामाला लागले आहेत. आपला पराभव होण्यासाठी काही कारणे असली तरीही पराभव स्विकारून नव्या उमेदीने येणाऱ्या आवाहनांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज झालो आहे. आदरणीय शरद पवार यांनी आपणास विधानसभा निवडणुकीच्या नंतर लवकरच विधान परिषदेवर घेत असल्याचे सांगितले होते.त्याप्रमाणे संधी मिळाली आहे. आता पक्ष नेत्रत्वाचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 पिंपळबनसाठी आवश्यकते पूर्ण सहकार्य – आ.शिंदे

           आमदार शिंदे यांनी त्यांचे कुलदैवत असलेल्या कुडाळच्या श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर देवांचेही सपत्नीक दर्शन घेतले.यावेळी त्यांनी  कुडाळ येथील बहुचर्चीत पिंपळबनला आवर्जून भेट दिली. लोकसहभागातून पिंपळबनचे काम पाहून ते अवाकच झाले. सुमारे दोनेशे पन्नास फूट लांबीची भली मोठी संरक्षक भिंत पाहून ‘जबरदस्तच ‘अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली .पिंपळबन साठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

         कुडाळ येथे पिंपळबन समितीच्या वतीने भिकूराक्षे व भाऊराव शेवते यांनी स्वागत केले. जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच वीरेंद्र शिंदे व ,सदस्य नटराज युवक मंडळाच्या वतीने प्रमोद बारटक्के, गजराज युवक मंडळाच्या वतीने  महेश पवार,जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती राजेंद्र शिंदे व संचालक यांनी तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अशा विविध ठिकाणी आ.शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.

                           आमदार शिंदे जावली तालुक्यात येत असल्याचा सुगावा त्यांच्या चाहत्यांना लागल्याने बर्याच दिवसांनी हुमगावला यात्रेचे स्वरूप आले होते.सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी शासनाने अनेक निर्बंध घालून दिले आहेत. त्यामुळे आवश्यक सावधगिरी बाळगून सर्वजण होते .त्यामुळे नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणाऱ्या आमदार शिंदे यांनी आलेल्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्विकार सुरक्षित अंतर ठेवून केला.

               आमदार शशिकांत शिंदे यांची तालुक्यात नेहमीच्या च स्टाईल ने एन्ट्री झाली. मागे पुढे एकसोएक गाड्यांचा ताफा .कार्यकर्त्यांची रेलचेल. आणि तो दिमाखदार पणा जावली करांनी बर्याच दिवसांनी अनुभला.आता विधान परिषदेवर असल्याने आमदार निधी टाकण्यासाठी मतदार संघाची सीमा नाही.त्यामुळे जनतेला आवश्यक असणारी कामे नक्कीच होतील असा विश्वास यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला. 

  • (सूर्यकांत जोशी.)
बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!