Skip to content

आरोग्य विभागाचे दुर्लक्षामुळे जावलीकरांची सुरक्षा रामभरोसेच – सयाजीराव शिंदे

बातमी शेयर करा :-

आरोग्य विभागाचे दुर्लक्षामुळे जावलीकरांची सुरक्षा रामभरोसेच – सयाजीराव शिंदे

सूर्यकांत जोशी कुडाळ – विभागा मार्फत पर जिल्ह्यातून येणारानी अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून मग गावात जाऊन होमक्वारंटाईन व्हावे असे सांगितले आहे.पण याची त्यांनी व्यापक प्रसिद्धी केली नाही .तसेच परजिल्हयातून येणाऱे  हा नियम पाळतीलच असे नाही.त्यामुळे अनेक लोक आजही पास असला नसला तरीही सरळ गावात येत आहे. ग्राम दक्षता समितीच्या निदर्शनास आले तर अशा व्यक्तीला वेळीच होम क्वारंटाईन किंवा गावपातळीवरील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येत आहे. परंतु चोरपावलांनी गावात येऊन राहणारा गावात आलेवर जर आजारी पडला तर आरोग्य विभागाचे कोणीही तपासायला येत नाही .तर कळवूनही त्याला आरोग्य केंद्रात या म्हणतात.अशावेळी सदर व्यक्ती संभाव्य कोरोना संक्रमित असल्याची शक्यता असल्याने  त्या होमक्वारंटाईन व्यक्तीला कोण घेऊन जाणार असा प्रश्न आहे. कारण त्याला घेऊन जाईल ती स्थानिक व्यक्ती, वाहन वाला सगळे अडचणीत येतात व विनाकारण हाय रिस्क कॉन्टॅक्ट वाढतायत .म्हणून ज्या होमक्वारंटाईन व्यक्तीला त्रास होत असेल त्याला आरोग्य विभागाचे डॉक्टरानी घरी जाऊन तपासले पाहिजे व निर्णय घेतला पाहिजे.केवळ आशा सेविकांवर आरोग्य सुविधा सोपवल्याने धोका वाढतो आहे.तालुक्यात फिरते निरीक्षक पण सक्रीय नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने जावलीकरांचे आरोग्य रामभरोसे न ठेवता अधिक दक्षता घ्यावी असे आवाहन तालुक्यातील दक्ष सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव शिंदे यांनी केले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!