कुडाळच्या जिल्हा बँकेत ग्राहकांची तोबा गर्दी; सोशल डिस्टेन्सींगचा फज्जा
April 13, 2020/

सूर्यकांत जोशी कुडाळ- तीन दिवसांच्या सुट्टी मुळे तसेच मंगळवारी ही बँकेला सुट्टी असल्याने बँकेत आज सोमवारी पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी तोबा गर्दी केली. स्वतःच्या सुरक्षे पेक्षा अजूनही लोकांना पैसे अधिक महत्त्वाचे वाटत असल्याचा प्रत्यय कुडाळ येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठिकाणी दिसून आला. कोरोना पासून स्वसंरक्षण करण्यासाठी सोशल डिस्टेन्स ठेवणे आवश्यक आहे. मात्र याठिकाणी सोशल डिस्टेन्सींगचा पूर्ण फज्जा उडाला असल्याचे दिसून आले.बँकेचे कर्मचारी ग्राहकांना सोशल डिस्टेन्स ठेवण्यासाठी वेळोवेळी सूचना करत होते. त्यानंतर पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्राहकांना संभाव्य कोरोना धोका समजावून सांगितल्या नंतर ग्राहकांनी सुरक्षित अंतर ठेवून सहकार्य केले.
[the_ad id="4264"]