कुडाळ परिसरात जोरदार पावसाची हजेरी
सूर्यकांत जोशी कुडाळ – शुक्रवारी दुपारी साडेतीन ते साडेचार या एक तासात मान्सून पूर्व पावसाने कुडाळ परिसरात जोरदार हजेरी लावली. खरीप हंगामासाठी हा पाऊस अत्यंत आवश्यक असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. तर काही शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या पावसावर पेरणी उरकली आहे.दरम्यान हा पाऊस सरताळे,म्हसवे आणि कुडाळ गावठाण परिसरात पडला असल्याची माहिती मिळत आहे.