Skip to content

संगठन, सुसंवाद आणि सुयोग्य नियोजना बाबत जावली तालुक्यात खा. उदयनराजेंची आघाडी

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ -लोकसभा निवडणूकीची तयारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या वर्षे भरा पासूनच सुरु होती. बूथ लेवल पर्यन्त भक्कम बांधणी करण्यात आली होती. विविध आघाड्यांच्या माध्यमातून तळातील मतदारां पर्यंत पोहचून भाजपाची ध्येय धोरणे पोहचवली गेली. महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळताच खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशी दिलजमाई केली. तसेच मतदार संघातील अन्य आमदार व नेते मंडळीना विश्वासात घेत साद दिली.त्यामुळे या निवडणुकीत सुरवाती पासूनच खा. उदयनराजेनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत होते.

            जावली तालुक्याचा विचार करता तालुक्यात खा. उदयनराजेंचे अगदी मोजाकेच कार्यकर्ते आहेत.परंतु आ. शिवेंद्रसिंह राजेंची जावली तालुक्यावर मजबूत पकड आहे. ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, बाजारसमितीचे सभापती जयदीप शिंदे यांच्या सह स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पधादिकारी अशी मातब्बर कार्यकर्त्यांची फौंज आ. शिवेंद्रराजेंच्या पाठीशी आहे.आणि निवडणुकीच्या आता शेवटच्या टप्यात गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी जबाबदारी हाती घेऊन काम करत असल्याचे दिसून येत आहे.

            त्या तुलनेत महाविकास आघाडीचे  आ.शशिकांत शिंदे यांची एकाकी लढाई दिसून येत आहे.आ. शशिकांत शिंदे यांची लोकसभा निवडणूकीची कोणतीही पूर्व तयारी नव्हती. अगदी अनपेक्षित पणे त्यांना ऐन वेळी उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे सर्व जुळवाजुळव करण्यात त्यांना सुरुवातीचा वेळ द्यावा लागला. गेल्या दहा वर्षात शशिकांत शिंदे यांचा जावंळीतील जनतेशी संपर्क तुटला होता. लोक नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. त्याप्रमाणे आ. शिवेंद्रसिंह राजेंनी आपले संगठन कौशल्याने जावळीतील कार्यकर्ते व जनतेच्या मनात प्रेम व विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यातच यापुढील काळातही आ. शिवेंद्रसिंहराजेंच सत्ताधीश राहणार असल्याने कोणताही कार्यकर्ता तुसभरही दुसरीकडे सरकाण्याचे धाडस करताना दिसत नाही.

              आ. शशिकांत शिंदे दहा वर्षे जावली चे आमदार राहिल्याने तळागाळातील सर्वसामान्य जनतेला ते जवळून परिचित आहेत. परंतु त्यावेळची आपुलकी व जिव्हाळा या निवडणुकीत मतदानात रूपांतरित होईल का हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या पूर्वी जावली तालुक्यातून वसंतराव मानकुमरे यांनी दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती. परंतु मतदारांनी स्थानिक उमेदवार अथवा भूमिपुत्र म्हणून तालुक्यातून लीड दिले नाही हा इतिहास आहे. त्यामुळे आ. शशिकांत शिंदे यांनी जावळीचे भूमिपुत्र म्हणून जावळीतील मतदारांना घातलेल्या सादाला मतदार किती प्रतिसाद देतात हे पहावें लागणार आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!