रेशनिंगचे धान्य नेहण्यासाठी डोक्यावर बोजा घेऊन दोन ते पाच किलोमीटरची पायपीट ; कुडाळ परिसरातील गोरगरिब जनतेचे हाल.रेशनिंग धान्य वाटप गावपातळीवर होणार – तहसीलदार

रेशनिंगचे धान्य नेहण्यासाठी डोक्यावर बोजा घेऊन दोन ते पाच किलोमीटरची पायपीट ; कुडाळ परिसरातील गोरगरिब जनतेचे हाल.रेशनिंग धान्य वाटप गावपातळीवर होणार – तहसीलदार
सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ परिसरातील सर्जापूर,सरताळे, गणेशवाडी, कापसेवाडी, पुनर्वसित पानस इत्यादी गावातील गोरगरीबांना रेशनिंगचे धान्य कुडाळ येथील रेशनिंग दुकानातून वितरण करण्यात येत आहे. सध्या सर्व प्रकारची सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद असल्याने रेशनिंग कार्डवरील कुटुंबातील सदस्य संख्येनुसार दहा ते पन्नास किलोहुन अधिक धान्याचा बोजा डोक्यावर घेऊन दोन ते पाच किलोमीटरची पायपीट लोकांना करावी लागत आहे. आता तीन महिन्यांसाठी रेशनिंग धान्याचे वाटप होणार असून यामध्ये आता बहुतांश केसरी कार्ड धारकांना सवलतीच्या दरात रेशनिंग दुकानात धान्य मिळणार आहे. त्यामुळे ही गर्दी आता तिपटीने वाढणार आहे.संभाव्य गर्दी आणि त्यातुन निर्माण संभाव्य कोरोना संसर्गाचा धोका आणि गर्दी मुळे होणारे वादविवाद टाळण्यासाठी गावपातळीवरील शासकीय यंत्रणेद्वारे ज्यात्या गावात धान्य वाटप करण्यात यावे अशी मागणी जनतेतुन होत आहे.
सदरबाब जावलीचे तहसीलदार शरदपाटील यांच्या निदर्शनास आणुन दिली असता त्यांनी संभाव्य गर्दी आणि लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मे महिन्याचे रेशनिंग धान्य ज्या त्या गावात वाटप करण्यासाठी सूचना देत असल्याचे सांगितले.