Skip to content

आ. शिवेंद्रसिंह राजें च्या माध्यमातून कुडाळ ची नविन सुधारीत जलजीवन योजना १०कोटी ३४लक्ष रुपये ची मंजुर:सौरभ बाबा शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेयर करा :-

जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत कुडाळ येथील सुधारीत योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
श्रीमंत छ. मा.आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातुन व मा.सौरभ बाबा शिंदे ह्यांच्या पाठपुराव्याला यश.
आता ही नविन योजना तब्बल रुपये दहा कोटी चौतीस लाख आठ हजार चारशे चाळीस (₹१०,३४,०८,४४०) ची मंजुर झालेली आहे. मागिल योजना फक्त ९० लक्ष रुपये ची असल्याने त्यात सुधारणा करून त्याचा प्रस्ताव मंजुर करून घेण्यात आला आहे.
नविन सुधारीत योजनेमुळे कुडाळ मध्ये नविन पाण्याच्या अधिक क्षमतेच्या टाक्या- पाणी फिलट्रेशन प्लांट- सोलर सिस्टम- संपुर्ण गावाची पाईप लाईन- खोदकाम होईल तिथे कॅांक्रिटीकरण असे विविध गोष्टी ज्या जुन्या योजनेत न्हवत्या त्या ह्यात समाविष्ठ करण्यात आल्या आहेत.
नविन योजने अंतर्गत पाण्याच्या नविन टाकी ह्या पंचशील नगर – फुले नगर – डबडेवाडी – गोपाळपंताचीवाडी – वारागडेआळी शेजारील जुनी पाण्याची टाकी निर्लेखीत करून अधिक क्षमतेची नविन पाण्याची टाकी अशा पाण्याच्या टाकींचा समाविष्ठ ह्या नविन योजनेत झाल्या आहेत ज्या जुन्या योजनेत घेतल्या गेल्या नाहीत.
ह्याचे सर्व श्रेय मा.आ.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.सौरभ बाबा शिंदे यांनी पाठपुरावा करून ही सुधारीत योजना कुडाळ ची मार्गी लावल्याने कुडाळ चा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पुढील ५० वर्षांचा मार्गी लागणार आहे.
मा.आ.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांचे कुडाळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी मनापासुन आभार मानले.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!