निवडणूक वारसा हक्काने नव्हे तर कर्तृत्वावर लढवली जाते : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सूर्यकांत जोशी कुडाळ – निवडणूक ही वारसा हक्काने नव्हे तर कर्तृत्वावर लढवली जाते. आपण काम करत असताना कधीही मतांचा विचार केला नाही. अगदी छोट्या वाड्यावस्त्या पर्यंत विकास कामे पोचवले आहेत. काम केले असल्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत चढत्या क्रमाने मतदान मिळत आहे असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
माझ्यासाठी जो कार्यकर्ता वेळ देईल व काम करेल त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार असे प्रतिपादन सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. कुडाळ तालुका जावली येथे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांच्या वतीने कार्यकर्त्यांना दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणा शिर्के, रवींद्र परामणे, हनुमंतराव पार्टे, तानाजीराव शिर्के, श्रीहरी गोळे, सुरेखा कुंभार, हिंदुराव तरडे व मान्यवर उपस्थित होते.
बबब माझ्यासाठी वेळ देणाऱ्या व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आणि अडचणीच्या प्रसंगी ठाम उभा राहणार, कार्यकर्त्यांचा विश्वासघात कधीही होणार नाही. कार्यकर्ता छोटा असो वा मोठा त्याला ताकद देणारच अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली