आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज कुडाळ येथे भव्य जाहीर सभा :


सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवारी कुडाळ येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असून मतदार बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी सायंकाळी पाच वाजता कुडाळ ग्रामपंचायत समोर या जाहीर मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांनी केले आहे. ही निवडणूक विधानसभेसाठी होत असली तरी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीसाठीची मोर्चे बांधणी केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.कुडाळ जिल्हा परिषद गटातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. ही निवडणूक आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या पेक्षाही कार्यकर्त्यांनीच आपल्या हातात घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.