आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना 100% मतदान करण्याचा प्रभूच्या वाडीतील महिलांचा निर्धार


सूर्यकांत जोशी कुडाळ –सातारा जावलीचे दमदार आमदार मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रभूचीवाडी गावातुन 100% मतदान करण्याचा संकल्प गावातील सर्व महिलांनी केला आहे. अशी माहिती सावली महाबळेश्वर बाजार समितीचे संचालक मच्छिंद्र मुळीक यांनी दिली.
आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी गावातील माता-भगिनी यांनी जिल्हा परिषद कुडाळ गटातील सर्व गावांना भेटी देऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निश्चय केला आहे त्यासाठी सर्व महिला प्रत्येक गावी भेटी देत आहेत तसेच गावातील महिलांच्या करीता जावली महाबळेश्वर कृषी बाजार समितीचे संचालक मा. मच्छिंद्र लक्ष्मण मुळीक यांनी प्रभुचीवाडी गावातील महिलांच्या करीता पुसेगाव,गोंदवले,पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रा चे देवदर्शन सहल आयोजित केल्याने सर्व महिलांचा आनंद द्विगुणित झाला असून येणाऱ्या 23 तारखेला शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राज्यात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून यावेत यासाठी सर्वचमहिलांनी श्री. विठ्ठल रुक्मिणी, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, आई तुळजाभवानी यांच्या चरणी प्रार्थना केली.