प्रजासत्ताक दिनी दिनेश किर्वे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सूर्यकांत जोशी कुडाळ -भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश किर्वे यांनी हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले. तसेच शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देऊन गौरवण्यात आले. मनमंदिर मतिमंद मुलांना बायोमेट्रिक मशीन आणि, वस्तू बनवण्यासाठी लागणारे साहित्य देण्यात आले.
यावेळी कुडाळ गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य , प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे , सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे , मा जितेंद्र शिंदे , मा वीरेंद्र शिंदे , तिळवंत तेली समाजाचे अध्यक्ष रघुनाथ ,किर्वे अरुण किर्वे ,संतोष किर्वे ,बाळू बापू किर्वे, रघु बापू किर्वे , प्रदीप शेजवळ , गोल्डन स्टार पदाधिकारी उपस्थित होते
या प्रोत्साहन पर मदतीच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय जीवनात प्रगती करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा दिनेश किर्वे यांनी व्यक्त केली.याप्रसंगी तिळवण तेली समाज, गोल्डन ग्रुप गावातील ज्येष्ठ नागरिक, पालक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
