Skip to content

पाचवड मेढा व कुडाळ पाचगणी रस्त्यावरील खड्डे देतात अपघाताला निमंत्रण

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील प्रमुख राज्य मार्ग असणाऱ्या पाचवड ते मेढा व कुडाळ ते पाचगणी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मतदार संघातील रस्त्यांबाबतच संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पाचवड ते रत्नागिरी हा कोकणाला जोडणारा रस्ता होणार असून त्याचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू आहे. असे असले तरी हे काम पूर्ण होण्यास काही अवधी लागणार आहे. त्यामुळे असणाऱ्या रस्त्याची डागडुजी होणे आवश्यक आहे. पर्यटन स्थळ असणाऱ्या पाचगणी व महाबळेश्वरला जोडणारा हा रस्ता आहे तसेच मेढा मार्गे कास बामनोली तापोळा यासारख्या पर्यटन स्थळाकडे सुद्धा पर्यटक या रस्त्याने प्रवास करत असतात त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे विशेषता दुचाकीचे अपघात घडत आहेत. तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रस्त्यावरील खड्डे तातडीने मुजविण्यात यावेत अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!