तीर्थक्षेत्र मेरुलिंग येथील शिवपार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न
April 9, 2025/

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावळी तालुक्यातील स्वयंभू शिवलिंग असणाऱ्या तीर्थक्षेत्र मेरुलिंग येथील आराध्य दैवत मेरूलिगेश्वर तथा शिवपार्वती यांचा विवाह सोहळा मंगळवारी रात्री उत्साहात संपन्न झाला. तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रे दिवशी येथील श्री शिवपार्वतीचा विवाह संपन्न होतो. शिखर शिंगणापूर येथील यात्रेनिमित्त प्रज्वलित केलेली दीपमाळ मेरुलिंग येथून दिसते. अशी आख्यायिका आहे. त्याचबरोबर मेरोलिंग येथील देवांची हळद श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यांना लावण्यासाठी आणली जाते अशी प्रथा आहे. यावरूनच शंभू महादेव, मेरुलिंग चे मेरोलिंगेश्वर ( शिवपार्वती ) यांचा अनोखा ऋणानुबंध असल्याचे दिसून येते.
[the_ad id="4264"]