टेम्पो ट्रॅव्हलरने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू

सूर्यकांत जोशी कुडाळ – केळघर मेढा रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलर ने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडे नऊ च्या सुमारास हा अपघात घडला.
या बाबत मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 15/4/2028 रोजी रात्री 09.30 वाजण्याच्यापूर्वी नामदेव ज्ञानू शेलार वय 55 वर्ष हे त्यांच्या स्वतःचे मेढा येथील किराणा मालाचे दुकान बंद करून त्यांची स्वतःची हिरो होंडा फॅशन प्रो कंपनीची सिल्वर काळया रंगाची मोटरसायकल क्रमांक MH-11BJ0885 ही घेऊन त्यांचे आंबेघर येथील घरी येत असताना समोरून येणारी पांढऱ्या रंगाची टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक MH-43BP 9351 या गाडीवरील चालक सुरेश जाधव वय 20 वर्ष राहणार बावळे तालुका जावली जिल्हा सातारा याने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हलगर्जी निष्काळजीपणाने व हायगयीपणाने चालवून केळघर ते मेढा जाणाऱ्या डांबरी रोडवरून ज्ञानदेव किसन रांजणे यांच्या घराच्या मागील बाजूस डांबरी रोडवर समोरून येणाऱ्या हिरो होंडा फॅशन प्रो सिल्वर काळया रंगाची मोटरसायकल क्रमांक MH-11, BP 00885 हिला जोराची धडक दिली.
या अपघातात नामदेव ज्ञानू शेलार गंभीर जखमी झाले होते.त्यांचे मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून पांढऱ्या रंगाची टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी क्रमांकMH- 43 BP 9351 या गाडीवरील चालक साहिल सुरेश जाधव वय 20 वर्ष राहणार बावळे याच्या विरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि. सुधीर पाटील करत आहेत.