कुडाळ- फुलेनगर येथे आवश्यक विद्युत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या नामदार शिवेंद्रसिंह राजेंची सूचना
April 28, 2025/


सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ येथील फुले नगर परिसरात असणाऱ्या विजेच्या गैरसोयी बाबत येथील नागरिकांनी ना.श्रीमंत छ.शिवेंद्र राजे भोसले यांची प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या समवेत जाऊन नुकतीच भेट घेतली. यावेळी नविन डी.पी. व वाढीव पोल आणि एल.टी.लाईन बसवण्यासाठी ची मागणी करण्यात आली. याबाबत नामदार बाबाराजेंनी वीज वितरणच्या संबंधीत अधिकाऱ्याना जिल्हा नियोजन मंडळच्या फंड मध्ये सदर काम बसवण्याच्या सुचना दिल्या.तसेच यासाठी आवश्यक खर्चाचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करण्याच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सदरचे अडचण सोडवण्यासाठी तातडीने दखल घेतल्या बद्दल त्यांचे फुलेनगर,कुडाळ ग्रामस्थ यांच्या वतीने आभार मानन्यात आले.
[the_ad id="4264"]