Skip to content

जावलीत आणखी तीन कोरोना पाँसिटीव्ह;सुदैवाने मेढ्याला दिलासा, तर सायगांव मध्ये शिरकाव

बातमी शेयर करा :-

जावलीत आणखी तीन कोरोना पाँसिटीव्ह;सुदैवाने मेढा ग्रामीण रुग्णालयातील परिचारीकेच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह, तर सायगांव मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव

सूर्यकांत जोशी कुडाळ – शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवात जावली तालुक्यातील तीन जणांचा अहवाल पाँसिटीव्ह आला आहे. सुदैवानेमेढा ग्रामीण रुग्णालयातील परिचारीकेच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह आल्याने मेढा व परिसरातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

               रात्री उशीरा आलेल्या अहवालात बिरामणेवाडी येथील पूर्वीच्या रुग्णाची पत्नी वय ४५ वर्षे  व मुलगी  १६ वर्षे तर सायगांव मध्ये कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून मुंबई हुन एक जूलैला आलेल्या साठ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांनी दिली आहे. जावलीतील जनतेने अधिक सतर्क रहावे असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  सतीश बुद्धे यांनी केले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!