Skip to content

जावलीत आज तेरा कोरोना पाँसिटीव्ह रुग्णांची वाढ.

बातमी शेयर करा :-

जावलीत आज तेरा कोरोना पाँसिटीव्ह रुग्णांची वाढ. पुनवडी बनले कोरोना हाँटस्पाँट

सूर्यकांत जोशी कुडाळ -दि.१२; जावली तालुक्यात पुनवडी येथील आणखी बारा तर कुसुंबी आखाडे वस्ती येथील एक अशा तेरा  जणांचा अहवाल आज  रविवारी रात्री  कोरोना पाँसिटीव्ह आला आहे. यापूर्वी पुनवडी येथे सतरा रुग्ण आढळले असून एकूण  २९  कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण झाले आहेत . हे गाव आता कोरोनाचा हाँटस्पाँट बनले आहे.जावली तालुक्यात शनिवार अखेर एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या १८०  झाली आहे .सायगांव येथील ५६ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचा अहवाल शनिवारी रात्री आला आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

         दरम्यान पुनवडी येथील आणखी चोपन्न लोकांचे स्वाब घेण्यात आले आहेत.

              पुनवडी येथे पाटण येथे लग्नासाठी गेलेले  लोक कोरोना बाधित झाले आहेत. या लग्नात नवरी मुलीचाच अहवाल कोरोना बाधित आला आहे. त्याचबरोबर मुंबई हुन आलेल्या व्यक्तींनी कोरंटाईनचे नियम न पाळल्याने या गावातील सरपंच, पोलीस पाटलांसह लोक कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर येत आहे.

  लोकांचा बेजबाबदार पणाच कोरोनाला आमंत्रण देत आहे – बुद्धे

        कन्टेमेंट झोन मधून येणारे लोक होमक्वारंटाईन पाळत नाही. त्यांच्या संपर्कात घरातील लोक येतात. व घरातील अन्य लोक समाजात वावरत असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे  यापुढे मुंबई पुण्यासह इतर जिल्हातून येणाऱ्या लोकांना ग्रामस्तरीय विलगीकरण करणेची कारवाई दक्षता कमिट्यांनी करावी. अशी सूचना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केली आहे.

जावलीतील सायगांव गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला

            जावली तालुक्यातील सायगांव येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने या  गावाला जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन अध्यक्ष शरद पाटील ,गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार सायगांव या गावाला प्रतिबंधित क्षेत्राचे (कन्टेमेंट झोन )निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. 

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!