Monday, August 17, 2026
HomeTop Newsरस्त्याच्या कामाचा दर्जा, दिरंगाई आणि मनमानी विरोधात कुडाळ ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. रस्त्याच्या...

रस्त्याच्या कामाचा दर्जा, दिरंगाई आणि मनमानी विरोधात कुडाळ ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.
रस्त्याच्या कामाबाबत खुलासा न केल्यास 15 ऑगस्ट पासून सामूहिक उपोषण

फोटो -कुडाळ बाजार पेठेत अर्धवट अवस्थेत असलेले गटाराचे काम (सूर्यकांत जोशी, कुडाळ )

सूर्यकांत जोशी कुडाळ :  कुडाळ ते पाचगणी या प्रमुख जिल्हा महामार्ग क्र. 25 वर माननीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रयत्नातून कुडाळमध्ये इंदिरानगर ते  बाजारपेठ मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोमर्डी या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाला आहे. या साठी साडे सात कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे.  गेल्या वर्षभरापासून मंद गतीने चालू असून  अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे   ग्रामस्थ महिला माता भगिनी व शाळकरी मुळे यांचे प्रचंड हाल होत आहेत . हे काम जलद गतीने व दर्जेदार व्हावे अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. त्याच बरोबर या कामाच्या अंदाजपत्रक व आराखड्याची माहिती ग्रामस्थांना दिनांक 14 ऑगस्ट पूर्वी देण्यात यावी अन्यथा 15 ऑगस्ट पासून उपोषणासह विविध प्रकारचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार,पोलीस विभाग यांना देण्यात आले आहेत.

पाचवड ते खेड दरम्यान होणाऱ्या महामार्गावर अनेक ठिकाणी पुलांचे रखडलेले कामे तसेच कुडाळ येथील बंदिस्त गटार बांधकामात   ठेकेदार व अधिकाऱ्यांची मनमानी याबाबत जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि याबाबत आवाज उठवण्यासाठी  ग्रामपंचायत कुडाळ मध्ये सर्व ग्रामस्थांची  बैठक झाली .त्यानंतर या विषयावर ग्रामसभा बोलवण्याचा आग्रह मा. ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामस्थांनी धरला,सोबतच संबंधित अधिकारी वर्गाला फोन करून कॉन्ट्रॅक्टरकडून कामांमध्ये त्वरित सुधारणा करून करण्यासाठी च्या सूचना करण्यात आल्या .

त्याचबरोबर दिनांक 14 ऑगस्ट 26 पूर्वी संबंधित अधिकारी व कॉन्टॅक्टर यांनी  प्रत्यक्ष ग्रामस्थांशी भेट घेऊन  पाहणी व चर्चा करून, काम कशा पद्धतीने होणार आहेत कोणत्या ठिकाणी गटर अथवा  रस्त्याची रुंदी कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने असणार आहे  त्याच्याविषयी खुलासा करावा असे पत्र बांधकाम विभागाला देण्यात आले आहे .

हा खुलासा दिनांक 14 ऑगस्ट पूर्वी न झाल्यास दिनांक 15 ऑगस्ट 26 पासून कुडाळ मधील सर्व जागृत नागरिक व युवा हे त्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको व प्रसंगी ग्रामपंचायत कुडाळ समोर सामूहिक उपोषणाला बसणार आहेत. असा इशारा कुडाळ ग्रामस्थांच्या वतीने या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page