Friday, June 12, 2026
HomeTop Newsसोमर्डी गावाचे भूषण  बहुआयामी व्यक्तिमत्व - मा.  रमेश परामणे तथा बापू यांचा...

सोमर्डी गावाचे भूषण  बहुआयामी व्यक्तिमत्व – मा.  रमेश परामणे तथा बापू यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा


     सूर्यकांत जोशी कुडाळ –    गावाचा विकास, समाजहिताची जपणूक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सोमर्डी गावातील ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री रमेश सावळा परामणे यांचे नाव आदराने घेतले जाते. यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्याविषयी कृतज्ञता आणि गौरव सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे . महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते बापूंचा गौरव करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता रामकुल ऍग्रो टुरिझम सोमर्डी येथे होणाऱ्या  या सोहळ्याला ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, जावली बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे,माजी चेअरमन चंद्रकांत गावडे, दत्ताशेठ भालेघरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप परामणे यांनी दिली आहे.
   दिलदार मनाचे आभाळमाया देणारे बापू -संदीप परामणे
स्वतःमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असताना सुद्धा युवा कार्यकर्त्यातील नेतृत्व गुण ओळखून त्याला ताकद देऊन मोठ्या मनाचा दिलदार आणि आभाळमाया देणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे रमेश बापू यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना शब्द अपुरे पडतात.
        राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत श्री. परामणे यांनी आपल्या कार्यातून गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, विकासकामांना चालना देणे आणि लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेणे, ही त्यांची कार्यशैली राहिली आहे.
समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याची त्यांची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत करणे, सामाजिक उपक्रमांना पाठबळ देणे आणि लोकांमध्ये सेवाभावाची जाणीव निर्माण करणे, या कार्यामुळे त्यांनी समाजमनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
        शिक्षण आणि संस्कृतीच्या जतनासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सोमर्डी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालयाच्या उभारणीपासून ते आजपर्यंत त्यांनी सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. त्यामुळे गावातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळींना बळ मिळाले असून अनेक पिढ्यांना त्याचा लाभ झाला आहे.
          त्यांच्या दीर्घकालीन समाजसेवेचा गौरव म्हणून अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. “सेवा, समर्पण आणि विकास यांचा अखंड प्रवास म्हणजे मा. रमेश सावळा परामणे,” अशा शब्दांत ग्रामस्थ आणि सहकारी त्यांच्या कार्याचा गौरव करीत आहेत.
       समाजकारण, लोकसहभाग आणि विकासाची अखंड तळमळ जपणारे श्री. परामणे यांचे कार्य नव्या पिढीसाठी आदर्शवत असून त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि समाजसेवेमय जीवनासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याचा ठसा सोमर्डीच्या सामाजिक आणि शैक्षणिक वाटचालीत कायम स्मरणात राहील, यात शंका नाही.
                      संदीप परामणे
            मंडलाध्यक्ष भारतीय जनता पक्ष
        

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page