Skip to content

कुडाळ येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू ; गरजुंनी शासनाच्या शिवभोजन योजनेचा लाभ घ्यावा- शरद पाटील

बातमी शेयर करा :-

कुडाळ येथील शिवभोजन थाळी केद्राचा शुभारंभ प्रसंगी तहसीलदार शरदपाटील, वीरेंद्र शिंदे,गणपत कुंभार, शहा.

सूर्यकांत जोशी कुडाळ – शासनाच्या माध्यमातून शिवभोजन थाळी केंद्र कुडाळ येथील स्वाद हाँटेल मध्ये सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात सध्या पाच रुपयांत भोजन मिळणार आहे. याचा पन्नास लाभार्थींना लाभ मिळणार आहे. तरी गरजुंनी शासनाच्या शिवभोजन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे.

          कुडाळ येथे आदिवासी कातकरी, भटके,विमुक्त, अपंग, निराधार, परप्रांतीय कामगार यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कुडाळ येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्याची आवश्यकता दैनिक ऐक्यच्या माध्यमातून करण्यात आली होती. कुडाळ ग्रामपंचायतीच्या वतीने ही  कुडाळयेथे शिवभोजन थाळी सुरु करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवला होता.याबाबत दखल घेऊन कुडाळ येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करणेबाबत तहसीलदार शरद पाटील यांनी विषेश प्रयत्न केले.

         या शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ तहसिलदार शरद पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला. यावेळी सरपंच वीरेंद्र शिंदे,उपसरपंच गणपत कुंभार, हेमंत शिंदे,महेश पवार, आर.जे.जाधव उपस्थित होते

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!