Skip to content

कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर: सुरक्षारक्षकांची नेमणूक होणे आवश्यक:

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावळी तालुक्यातील सर्वात मोठे व महत्त्वपूर्ण असलेल्या कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे पद अस्तित्वात नाही. केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर येथील सुरक्षा अवलंबून आहे. कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्मार्ट हेल्थ सेंटर या योजनेअंतर्गत नूतनीकरणाचे काम सुरू आहे.त्यामुळे आरोग्य केंद्रातील बहुतांश किमती साहित्य उघड्यावर आहे.या साहित्याची देखभाल करण्यासाठी कोणतीही पुरेशी सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नाही. सध्या कुडाळ व परिसरात सातत्याने छोट्या मोठया चोरीच्या घटना घडत आहेत.त्यामुळे या ठिकाणी आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालून पुरेशी सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी. तसेच पर्यायी व्यवस्था होत नाही तो पर्यंत येथील कोणत्याही कर्मचाऱ्यांस सेवामुक्ती आदेश देण्यात येऊ नये. याबाबत अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्याकडे जातीने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ व रुग्णांच्या वतीने करण्यात येत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण होऊन सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा या ठिकाणी लवकरात लवकर उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्याकडून केली जात आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!