जावली तालुक्यातील शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीची तळमळ वाखाण्याजोगी – धुमाळ , कुडाळ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात गुणी शिक्षक वर्ग असून तळमळीने काम करत आहेत. न्यू शिष्यवृत्ती पॅटर्नच्या माध्यमातून अधिक जोमाने काम सुरु आहे. त्यामुळेच तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत विध्यार्थी नेत्रदीपक यश मिळवत आहेत. कुडाळ प्राथमिक शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेतील निकालाची परंपरा कायम राखली असून विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक अभिनंदनास पात्र आहेत.शिक्षक पतसंस्थेकडून तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शन शिक्षक यांना कौतुकाची थाप मिळाली असून त्यांचा उचित सन्मान होत आहे. यातून विद्यार्थी व शिक्षकांना काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी केले.

कुडाळ ता. जावळी येथे जावली तालुका शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकताच गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी तालुक्यातील ५ वी, ८ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पतसंस्था सेवानिवृत्त शिक्षक सभासद यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ बोलत होते.
जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्रशाळा कुडाळ शाळेचे जावली तालुक्यात सर्वाधिक शिषवृत्तीधारक विद्यार्थी उतीर्ण झाले असून त्यामध्ये राज्यात एक व जिल्ह्यात पाच असे एकुण सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यामुळे तालुक्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा कुडाळ शाळेने रोवला आहे.
शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे बोलताना म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शिष्यवृत्ती परिक्षाभं त्याचा प्रारंभ आहे. याकरिता पालकांची भूमिकाही महत्वाची असून मुलांनी सातत्य,चिकाटी ठेवणे आवश्यक आहे. उद्याच्या काळात तालुक्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावेत. कुडाळ शाळेने तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी उर्तीर्ण करण्याचा बहुमान मिळवला आहे, तसेच राज्यातही एक विद्यार्थी लागला आहे ही तालुक्याला अभिमानाची गोष्ट आहे. याप्रसंगी शिक्षक समितीचे अध्यक्ष सुधाकर दुंदळे, उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे, माजी अध्यक्ष धिरेश गोळे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन वारागडे, अध्यक्ष सुरेश पार्टे, सरचिटणीस तानाजी आगुंडे, कुडाळच्या मुख्याध्यापिका सैा. जयश्री गायकवाड यांच्यासह तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक व विदयार्थी उपस्थित होते.
यावेळी सई प्रमोद मोहिते, वरद संतोष रासकर, प्रज्वल अमोल दिक्षित, आरोहि टोपन्ना गायकवाड, स्वरा सुहास पवार, अवनी ज्ञानेश्वर सावंत या सहा विद्यार्थांचा तसेच त्यांना मागर्दर्शन करणाऱ्या सैा.स्वाती बारटक्के, व सचिन पवार या दोन शिक्षकांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. समितीचे जिल्हासरचिटणीस संतोष मांढरे, धिरेश गोळे, सुरेश पार्टे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.सुधाकर दुंदळे यांनी प्रास्ताविक केले. नितीन जाधव ,सीमा पार्टे यांनी सूत्रसंचालन केले.