Skip to content

शासनाच्या विविध योजनांमुळे गर्दीला आमंत्रण

बातमी शेयर करा :-

कुडाळला बँक ऑफ महाराष्ट्र पुढे झालेली ग्राहकांची गर्दी.

बँका व रेशन दुकानापुढे  पुढे भल्यामोठ्या रांगा. सोशल डिस्टेन्सींगचा फज्जा. बाजारपेठेतील ग्राहकांची गर्दी ओसरली पण अनावश्यक फिरणारे मोकाट.

सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ बाजारपेठ सकाळी ९  ते सायंकाळी ६ पर्यंत नियमित सुरू केल्याने बाजारपेठेतील दुकानांतील ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. परंतू बाजारपेठेत अनावश्यक फेरफटका मारणारांची गर्दी अधिक वाढली आहे. तर बँका आणि स्वस्त धान्य दुकानांपुढे ग्राहकांच्या प्रचंड रांगा असून सोशल डिस्टेन्सींगचा फज्जा उडाला आहे. गर्दी करु नका असे सरकार सांगत आहे .परंतु शासकीय विविध योजनांच या गर्दीला आमंत्रण देत आहेत असे दिसून येत आहे.

             कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नये असे सरकारी यंत्रनाद्वारे व प्रसिद्धी माध्यमातून जनतेला वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. परंतु सरकारने जनधन खात्यात जमा केलेली पाचशे रुपयांची मदत काढण्यासाठी बँकापुढे रांगा लागत आहेत तसेच स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे मोफत व सवलतीच्या दरातील धान्य घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. कोणत्याही बँंकेने ग्राहकांना रांगेत उभे राहण्यासाठी सावलीची व्यवस्था केलेली नाही. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात अबाल व्रद्धांना तासंतास रांगेत उभे रहावे लागत आहे. कोरोना होऊन मरण्या ऐवजी या उन्हात जीव जायचा अशा संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांमधून व्यक्त होत आहेत.

             सरकार ने जनधन खात्यात जमा केलेली रक्कम पोष्टाकडे वर्ग करून पोष्टमन तर्फे घरपोच अनुदान पोहच केले असते तर बँकेत होणारी गर्दी टाळता आली असती. किंवा अशा तत्सम पर्यायांचा विचार शासन पातळीवर होणे आवश्यक आहे.अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. एकीकडे बाहेर फिरू नका गर्दी करु नका असे सांगायचे. दुसरीकडे तीस ते चाळीस गावांसाठी एकाच गावात बँक आहे. बँकेत जमा झालेले पैसे काढण्यासाठी सार्वजनिक वहातुक व्यवस्था बंद आहेत. खाजगी गाडीवर यावे तर पोलिसांच्या कारवाईची भिती. आणि होणाऱ्या गर्दीत कोरोना होण्याची धास्ती अशी सर्वसामान्य जनतेची गोची झाली आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!