माजी आमदार स्व. लालसिंगराव शिंदे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


*अजिंक्यतारा -प्रतापगड च्या दोनलाख साखर पोत्यांचे दि.26 ला पूजन – सौरभ शिंदे*
सूर्यकांत जोशी कुडाळ –
माजी आमदार स्व. लालसिंगराव शिंदे यांच्या 98 वी जयंती शुक्रवार दि.26 जानेवारी रोजी आहे.त्यानिमित्त अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समुहाच्या वतीने सन 2023/24 या गळीत हंगामात उत्पादित दोन लाख साखर पोत्यांचे पूजन आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली.
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
माजी आमदार स्व. लालसिंगराव शिंदे यांच्या जयंती निमित्त अजिंक्यतारा प्रतापगड कामगार मंडळाच्या वतीने शुक्रवार दि.26 रोजी भव्य रकदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारती मध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत या शिबिराची वेळ आहे. यावेळी रक्तदात्याना हेल्मेट, जार, हेडफोन अशा विविध वस्तू भेट देण्यात येणार आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा.
या कार्यक्रमाला प्रतापगड सहकारी साखर कारखाना तसेच अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती सौरभ शिंदे यांनी दिली आहे.
कमी पाण्यात खोडवा व्यवस्थापन : तज्ञांचे मार्गदर्शन
पाण्याची कमतरता असताना खोडवा व्यवस्थापन कसे करावे यासाठी आमदार शिवेंद्र राजे यांच्या सूचनेने आणि प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कृषी तज्ञ आणि सध्या नेटाफिम इरिगेशनचे कृषी तज्ञ श्री अरुणजी देशमुख यांचे व्याख्यान दुष्काळी परिस्थितीत खोडवा व्यवस्थापन कसे करावे याबद्दल प्रतापगड सहकारी साखर कारखाना च्या कार्यस्थळावर होणार आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा

