Skip to content

कुडाळला रविवारी सहकार परिषदेचे आयोजन – नामदार शिवेंद्रराजेंच्या उपस्थित होणार सर्व सहकारी संस्थांचा गैारव – सैारभ बाबा शिंदे

बातमी शेयर करा :-

कुडाळ ता. 25 – प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी स्वर्गीय राजेंद्र लालसिंगराव शिंदे (भैय्यासाहेब) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ या निमित्ताने एक अद्वितीय अशी सहकार परिषद 2025 चे आयोजन रविवार दिनांक २७/७/२०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ ता.जावली येथील स्वामी मंगल कार्यालय येथे करण्यात आले असल्याची माहीती प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष व व कार्यक्रमाचे आयोजक सैारभबाबा शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दीली आहे.केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ ची घोषणा केली असून त्यानिमित्ताने अजिंक्यतारा प्रतापगड उद्योग समूहाच्या वतीने जावली तालुक्यात पहिल्यांदाच सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी तालुक्यातील 51 विकास सेवा सोसायट्या, तसेच जावली सहकारी बँक, प्रतापगड सहकारी साखार कारखाना, जावली तालुका खरेधी विक्री संघ, विविध सहकारी पतसंस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, व सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या सर्व सहकारी संस्थांचा व पदाधिकाऱ्यांचा सन्मान तेसच उत्कृष्ठ काम करणाऱ्या संथा व व्यक्तींचा विशेष गैारव मान्यवरांच्या हस्ते करून सहकार तज्ञांचे मार्गदर्शन तसेच बक्षीस वितरणही यावेळी होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, मा.ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपस्तित राहणार असून, या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याच्या मार्गदर्शक संचालिका श्रीमती सुनेत्रा शिंदे, जि.मध्य.सह. बँकेचे संचालक मा.श्री.ज्ञानदेव रांजणे, जिल्हा उपनिबंधक मा. श्री. संजयकुमार सुद्रीक, अजिंक्यतारा सह. साखर कारखानाचे अध्यक्ष मा.श्री.यशवंत साळुंखे व्हा.चेअरमन मा. श्री. नामदेव सावंत, जावलीचे सहाय्यक निबंधक श्री. सुनील जगताप, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे, डी. एम. के. जावली सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री.विक्रम भिलारे, व्हा.चेअरमन श्री. चंद्रकांत दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. जयदीप शिंदे, उपसभापती मा. श्री. हेमंत शिंदे, किसनवीर साखर कारखान्याचे संचालक मा. श्री. हिंदुराव तरडे यांच्यासह जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी मा. श्री. राजेंद्र निकम, तसेच जावली तालुक्यातील सर्व विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व सचिव तसेच जावली तालुक्यातील सर्व सहकार संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन व व्यवस्थापक उपस्थित राहणार असून तरी या सहकार परिषदेस नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतापगड कारखान्याचे अ्ध्यक्ष सैारभ बाबा शिंदे यांनी केले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!