मित्राच्या मदतीसाठी जागली 34 वर्षांची मैत्री:लावण्या तरडे हिच्या पायाच्या उपचारासाठी 51 हजारांची मदत


सूर्यकांत जोशी कुडाळ – हुमगाव ता. जावली येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील सन 1990-91 च्या दहावीच्या वर्ग मित्रानी त्यांचा वर्गमित्र हिंदुराव तरडे याची कन्या लावण्या हिच्या उपचारासाठी केली 51000 रुपये ची आर्थिक मदत केली. या वर्ग मित्रानी गेली चौतीस वर्ष ही मैत्री जपली आहे.हे मित्र एकमेकांच्या सुखादुःखात नेहमीच सहभागी होत असतात.
हिंदुराव तरडे यांची मुलगी लावण्या हिला जन्मताच पायाने अपंगत्व होते. त्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रकिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तिला ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी मदत लागणार आहे याची वर्ग मित्रांना माहिती समजल्यानंतर संजय परामणे सोमर्डी आणि राजेश तरडे (पोलिस पाटील )बामणोली,साधना अनपट यांनी त्वरित आपल्या वॉट्सअप ग्रूप वरील सर्व वर्ग मित्रांना मदतीचे आवाहन केले.आपल्या 34 वर्ष पूर्वीच्या दहावीतल्या मित्रां ला मुलीच्या उपचारासाठी मदत हवी आहे समजल्यावर लगेचच मित्रांनी मदत कार्य सुरू केले ,आणि एकूण रक्कम 51000 रुपये कुमारी लावण्याचे वडील हिंदुराव तरडे बामणोली यांच्या कडे सुपूर्द केली,यासाठी दहावीच्या वर्गातील विविध गावातील मित्र आणि मैत्रिणींचे सहकार्य लाभले,यासाठी रामदास भालेघरे लता गोळे ,संतोष पार्टे , शशिकांत नवसरे,नयना दाभाडे,निर्मला धापते नवसरे,संतोष तरडे,अनिल परामणे,सुषमा परामणे ,शिवाजी पोफळे,ज्ञानेश्वर भिलारे,मीनाक्षी महाडिक , बाळू भिलारे,अंबादास पाडळे,दीपक पाडळे,लता शेलार,अनिता सोनवणे, सुजाता सूर्यकांत जोशी,संगीता काळे,वंदना भोसले,प्रकाश पोफळे ,विलास, पवार,जितेंद्र देसाई,मनोज गायकवाड ,राजेंद्र रसाळ,तानाजी भिलारे ,श्रीकांत पार्टे ,,अशा अनेक विविध गावातील मित्रांनी मदत केली आणि कुमारी लावण्या हिंदुराव तरडे बामणोली हिला उपचारासाठी पुरेशी मदत केली