प्रतापगडाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सांघिक प्रयत्न आवश्यक – आ शिवेंद्रसिंहराजे


प्रतापगड साखर कारखान्यावर दोन लाख साखर पोत्यांचे पूजन करताना आ शिवेंद्रसिंहराजे सौरभ शिंदे,शिवाजीराव मर्ढेकर,यशवंत साळुंखे, नामदेव सावंत,हणमंत पार्टे आदी मान्यवर
स्व. लालसिंगराव शिंदे जयंती दिनी दोन लाख पोत्यांचे पूजन
सूर्यकांत जोशी कुडाळ
स्वर्गीय माजी आमदार लालसिंगराव काका हे दूरदृष्टीचे नेते होते म्हणूनच त्यांनी जावली तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून विकास करण्याचे ध्येय ठेवले .प्रतापगडची साखर कारखान्याची धाडसने उभारणी केली.दुर्दैवाने प्रतापगड संकटात सापडला होता मात्र आता अजिंक्यतारा कारखान्याच्या मदतीने प्रतापगड कारखाना नक्कीच उभारी घेईल. यावर्षी प्रतापगडने दोन लाख साखरेच्या पोत्यांचा टप्पा पार केला आहे.शेतकऱ्यांनी असंच सहकार्य आपल्या हक्काच्या प्रतापगड कारखान्याला करावं. यामध्ये कोणतंही राजकारण कोणीही करू नये.प्रतापगड कारखाना सुरळीत चालण्यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.आ. शशिकांत शिंदे यांनी प्रतापगडला ऊस घालून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो तर दीपक पवार यांनी शेतकऱ्यांचा ऊस इतर कारखान्यांना पाठवला त्यांच्या बाबतीत जनतेने निर्णय घ्यावा असे प्रतिपादन आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त जयंतीचे औचित्य साधून कारखाना स्थळावर दोन लाख साखर पोत्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते यावेळी प्रतापगडचे चेअरमन सौरभ शिंदे,व्हा.चेअरमन एड.शिवाजीराव मर्ढेकर,अजिंक्यताऱ्याचे चेअरमन यशवंत साळुंखे,व्हा चेअरमन नामदेव सावंत,माजी सभापती मोहनराव शिंदे,उपसभापती तानाजी शिर्के, हनुमंतराव पार्टे,बुवासाहेब पिसाळ,अरुण कापसे, अजय शिर्के,रामदास पार्टे,माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार,दादा फरांदे,कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते,राजेंद्र भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले सर्वांच्या सहकार्याने प्रतापगड ने दोन लाख पोत्यांचा टप्पा पूर्ण केला असून अजून मोठा ध्येय आपल्याला गाठायच आहे.यासाठी सर्व यंत्रणा आम्ही उभी करत आहोत कारखान्याची आर्थिक स्थिती सक्षम होण्यासाठी अजून तीन गळीत हंगाम आपल्याला मेहनत घ्यावी लागेल सरासरी वर्षाला तीन- चार लाख टन गाळप होणे गरजेचे असून यासाठी आपण प्रथम इतर तालुक्यातला ऊस गाळपसाठी आणत असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी थांबून थोडं सहकार्य करावे प्रतापगडची शून्यातून उभारणी सुरू आहे आम्ही शब्द दिल्याप्रमाणे दर सुद्धा शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या तुलनेने चांगला दिला आहे. सभासद शेतकऱ्यांचा विश्वास कारखान्यावर असेल तरच तो कारखाना प्रगती करू शकतो कारखानास्थळावर कारखान्याचे संस्थापक लालसिंगराव काका व राजू भैय्या यांचे स्मारक उभारले जाईल असे आश्वासन आ.शिवेंद्रसिंह राजे यांनी दिले.
प्रतापगडचे चेअरमन सौरभ शिंदे म्हणाले गेली अनेक वर्ष प्रतापगड बंद अवस्थेत होता मात्र अजिंक्यतारा कारखाना आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मदतीने यावर्षी प्रतापगड दिमाखदारपणे गाळप करत आहे आपल्याला चार लाख टनाचा टप्पा वाटायचा असून शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी कारखान्यावर विश्वास ठेवून सहकार्य करावे इतर कारखान्यांच्या तुलनेत आपण दरही चांगला दिला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत त्यामुळे अनेकांना वाटले होते की प्रतापगड पैसे देईल का नाही पण त्यांचा भ्रमनिरास झाला असून आपल्या तालुक्याचा स्वाभिमान असलेला प्रतापगड वाचवण्यासाठी आणि तो कायम सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी असंच सहकार्य करावे असे आवाहन सौरभ शिंदे यांनी केले
सुरुवातीला माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व साखरेच्या पोत्यांचे पूजन विधिवत पूजन करण्यात आले प्रस्ताविक प्रास्ताविकात व्हा चेअरमन एड.शिवाजीराव मर्ढेकर यांनी स्वर्गीय माजी आ. लालसिंगराव काका व राजू भैय्या यांचे स्मारक कारखाना स्थळावर व्हावे अशी मागणी केली. तर आभार अजिंक्यतारयाचे व्हा.चेअरमन नामदेव सावंत यांनी मानले यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अरुण देशमुख यांचे ऊस व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले.
*आ शिवेंद्रराजेंनी आ शशिकांत शिंदे यांचे मानले आभार*
प्रतापगड साखर कारखाना कोणतेही राजकारण न करता कोणतेही हेवेदावे न ठेवता सुरू ठेवणार असल्याचे स्पष्टीकरण सुरुवातीलाच आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले होते विरोधकांचा ऊस पहिल्यांदा नेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते त्याला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आमदार शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील राजकीय दुरावा सर्वश्रुत असून तरीसुद्धा प्रतापगडच्या हिताचा विचार करून आमदार शिंदे यांनी आपला ऊस प्रतापगड साखर कारखान्याला घातला याबद्दल आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी आमदार शिंदे यांचे आपल्या भाषणात विशेष आभार मानले
दीपक पवार यांच्यावर आ.शिवेंद्रसिंह राजेंचे टीकास्त्र
आम्ही जावलीतील सहकारी संस्था टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र निवडणूक लागली की दीपक पवार पॅनल टाकून सहकारी संस्थांची निवडणूक लावत आहेत प्रतापगडला निवडणूक परवडणारी नव्हती म्हणून आम्ही बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र दीपक पवारांनी निवडणूक लावलीच आणि आता प्रतापगड सुरू असताना तालुक्यातील ऊस ते बाहेरच्या कारखान्यांना घालत आहेत प्रतापगडला त्यांचे सहकार्य अजिबात झालं नसून त्यांना आता सहकारावर बोलण्याचा अधिकार राहीला नाही त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते जावली करांनी ठरवावे
उसाबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन
जावली तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढावे यासाठी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव,अजिंक्यतारा व प्रतापगड उद्योग समूह, जिल्हा बँक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उसाची लागवड, उसाचे व्यवस्थापन, उसाची पाणी व्यवस्था, बियाणाची निवड,माती परीक्षण याबाबत तज्ञ मार्गदर्शन करणार असून त्यामुळे तालुक्यातील उसाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे तसेच उसाचे बियाणे उधारीवर देण्यासाठीही अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग प्रयत्नशील असल्याचे आ शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले
@