जावलीतील कावडी कन्टेमेंट मुक्त ; शिंदेवाडीचा कन्टेमेंट झोन मध्ये नव्याने समावेश.
June 18, 2020/

जावलीतील कावडी कन्टेमेंट मुक्त ; शिंदेवाडीचा कन्टेमेंट झोन मध्ये नव्याने समावेश.
सूर्यकांत जोशी कुडाळ -जावली तालुक्यातील कावडी या गावांत कोरोना संक्रमित रूग्ण आढळले होते.परंतु निर्धारित दिवसांत अन्य कोरोना संक्रमित रुग्ण या गावात आढळला नसल्याने मा.शरद पाटील सो.तहसीलदार तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन जावली व गटविकास अधिकारी पंचायत समिती जावली यांच्या संयुक्त अहवाला नुसार सदर कावडी गावचे कन्टेमेंट झोनचे निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर सातारा उपविभाग यांनी जारी केला आहे.
शिंदेवाडी ता.जावली येथील पन्नास वर्षीय पुरुषा म्रुत्यु पश्चात कोरोना पाँसिटीव्ह आल्याने शिंदेवाडी गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू झाले आहेत.
[the_ad id="4264"]