Skip to content

अवास्तव अपेक्षांमुळे नवरी मिळेना नवऱ्याला :

बातमी शेयर करा :-

 *गुरु व शुक्राचा अस्तामुळे ऐन लग्न सराईत  मुहूर्ताचा दुष्काळ.**

सूर्यकांत जोशी कुडाळ – काळानुसार होत असलेल्या सामाजिक, आर्थिक व वैचारिक बदलांचा परिणाम विशेषतः मुला मुलींच्या लग्नाच्या वयात प्रकर्षाने जाणवत आहे. वैवाहिक जीवनातील जोडीदारा बाबत असणाऱ्या अवास्तव अपेक्षांमुळे विवाह ठरण्यात अडचणी येत असल्याने नवरी मिळेना नवऱ्याला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच यावर्षी गुरु व शुक्राच्या अस्ता मुळे ऐन लग्न सराईतील मे व जून महिन्यात विवाह मुहूर्त नसल्याने विवाह मुहूर्ताँबाबत दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी स्थिती आहे.

              देशात गेल्या काही वर्षात चांगलीच शैक्षणिक क्रांती झाली आहे. शासनाने मुलींच्या शिक्षणाबाबत प्रभावी धोरण राबावल्याने आज वाडी वस्ती, डोंगर कपारितील गरीब कुटुंबातील मुली उच्च शिक्षित होत आहेत. शिक्षणामुळे मुलींचे महिलांचे आर्थिक व बौद्धिक सक्षमीकरण झाले आहे. मुलींनी शिक्षणात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.त्याच बरोबर नोकरी व व्यवसायात आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे.नुकतेच जाहीर झालेले दहावी बारावीचे निकाल पाहिले तरीही गुणवत्तेच्या बाबत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे.

            यावर्षी पासून तर महाराष्ट्र शासनाने मुलींना सर्वच क्षेत्रातील उच्च शिक्षण मोफत केले आहे. त्यामुळे अगदी गरीब कुटुंबातील मुलींना सुद्धा डॉक्टर, वकील, इंजिनिअर यासह विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. वास्तविक महिला सबली करणाच्या दृष्टीने हे अगदी आवश्यक आहे. परंतु त्याच वेळी मुलांच्या शिक्षणाच्या बाबत पालक आणि शासनाने तितक्याच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आणि मुलांनी सुद्धा यास्पर्धेत पुढे जाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या बाबत याठिकाणी एवढा उहापोह करण्याचे कारण म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्या मध्ये शिक्षण आणि नोकरी यामुळे आर्थिक व वैचारिक मोठी दरी निर्माण होत आहे. आणि त्याचा परिणाम आज विवाह जुळणे आणि झालेले विवाह टिकण्यावर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.त्याच बरोबर जातपात धर्म यांच्या पलीकडे जाऊन प्रेम आणि भावी जीवनातील आर्थिक सुख पाहून होणाऱ्या प्रेम विवाहांची संख्या वाढत आहे.

            आज खेड्यातील अगदी झोपडीतील मुलीला सुद्धा शहरांत राहणारा व नोकरी करणारा मुलगा हवाय. ही अपेक्षा केवळ मुलींचीच नाहीतर तिच्या पालकांची सुद्धा आहे.अगदी थोडंफार शिकलेल्या मुलीला तिच्या योग्यतेची नोकरी शहरांत मिळवून स्वतःच्या पायावर उभे रहावे अशी अपेक्षा असतें. तसेच रुपेरी पडद्यावर दिसणारे कोणत्याही बांधनशिवायचे मुक्त जीवन आताच्या मुलींना अपेक्षित आहे. त्यामुळे विवाहसाठी जोडीदार शोधताना त्याच्या रंग रूपा आणि संस्कार या पेक्षा शिक्षण आणि नोकरी कडे प्रथम पाहिले जाते.त्यामुळे गावी राहणारा, खाजगी नोकरी करणारा, कमी शिकलेला आणि शेती करणाऱ्या मुलांचे परिचय पत्र बाजूला ठेवले जाते. आज गावोगावी पंचांवीस ते पस्तीस वयोगटातील बिन लग्नाच्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

             वास्तविक खेडेगावात राहून सचोटीने शेती व शेतीपूरक व्यवसाय करून दरवर्षी लाखोंची कमाई करणारे सुद्धा अनेक होतकरू तरुण आहेत.अशा तरुणांच्या पालकांना सुद्धा मुलाचे लग्न ठरवताना अडचणी येत आहेत. आणि दुसरा समज असा की गावात राहणारी मुलं संगतीन बिघडतात. हे काही अंशी खरे असू शकते. परंतु त्याला अपवाद आहेतच. तरी सुद्धा मुलांनी आपले हित कशात आहे. हे स्वतः पाहणे आवश्यक आहे. त्याबरोबरच मुलांच्या पालकांनी मुलांची संगत आणि त्याच्या व्यसनांना वेळीच पायबंद घातला पाहिजे. दारू, झुगार, मटका यासारख्या व्यसनी आणि कामधंदा सोडून राजकीय नेत्यांच्या पाठी फिरणाऱ्या मुलांना कोणतीही मुलगी सहज स्वीकारू शकत नाही.हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.

               लग्न ठरण्याची समस्या केवळ गावात राहणाऱ्या किंवा कमी शिकलेल्या मुला मुलीच्या बाबत आहे असे नाही. तर उच्च शिक्षित मुलामुलीमध्ये असणाऱ्या भ्रामक अपेक्षा मुळे विवाह जुळवण्यात अडचणी येत आहेत. अगदी वकील, डॉक्टर, इंजिनिअर सुद्धा लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. उच्च शिक्षितामध्ये लग्न ठरवण्याची जेवढी समस्या आहे त्यापेक्षा झालेले विवाह टिकावंण्याची अधिक जास्त समस्या दिसून येत आहे. कौटुंबिक न्यायालयात आज घटस्फोटसाठी उच्च शिक्षितांची गर्दी अधिक दिसत आहेत. त्यातच महिला संरक्षण आणि सक्षमी करणासाठी सरकारने कायदे केले. परंतु या कायाद्याचा काही उच्च शिक्षित मुलीनी गैर फायदा घेत पैसे कमावण्याचा गोरस धंदा सुरु केला आहे. घटस्फोट देण्यासाठी मुलींकडून मोठ्या रकमेची मागणी केली जाते. यामध्ये अनेक तरुणांचे जीवन उध्वस्त होत आहे.

            दिवसेंदिवस विवाह समस्या अधिक गंभीर होत आहे. विवाह ठरण्याचे प्रमाण खूप कमी आहे. मुलींचे लग्नाचे वय पंचविसच्या पुढे जात आहे. तर पस्तीशी पर्यंत मुलांना वाट पहावी लागत आहे. यात अर्धेआयुष्य संपत आहे.हा सामाजिक बदल अजून कुठल्या थराला जाऊन पोहचणार आहे. हे येणारा काळच ठरवेल.

            या वर्षी ऐन लग्न सिझन मध्ये दि.6 मे रोजी शुक्राचा लोप झाला आहे. दि.8 मे रोजी गुरुचा लोप होऊन 1 जून रोजी गुरु उदय झाला आहे.तर शुक्र दि.25जून रोजी शुक्राचा उदय होत आहे. त्यामुळे दरम्यानच्या विवाह मुहूर्त पंचांगात दिले नाहीत.28 जून नंतर विवाह मुहूर्त आहेत. परंतु पावसाळा, शेतीची कामे, शाळा कॉलेज सुरु होणार असल्याने ठरलेले विवाह सुद्धा लांबनीवर पडत आहेत. त्याचा परिणाम बाजार पेठांतील उलाढाधीवर होत आहेत.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!