Skip to content

जावली तालुक्यात सोमवारी तीन कोरोना पाँसिटीव्ह रुग्णांची भर

बातमी शेयर करा :-

जावली तालुक्यात सोमवारी तीन कोरोना पाँसिटीव्ह रुग्णांची भर

एकूण ८४, डिस्चार्ज ६८,बळी ७

कुडाळ- जावली तालुक्यात कोरोनातून बरे होऊन जाणारे सुखद आनंद देत असतानाच पुन्हा नव्याने होणारी कोरोना पाँसिटीव्ह रुग्णांची वाढ काळजी वाढवत आहे. सोमवारी रात्री आलेल्या अहवालात तालुक्यातील  पूर्वीच्या रुग्णांच्या हायरिस्क काँन्टेक्ट मधील गांजे येथील २४ वर्षीय पुरुष, म्हाते खूर्द येथील ३८ वर्षीय पुरुष व ११ वर्षे वयाच्या मुलागा यांचे अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली आहे. 

             तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ८४ वर पोहचली असून ६८ जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. सात७ जणांचा बळी गेला आहे. तर ९  कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

           दरम्यान तालुक्यात आता पर्यंत १०,१९१  लोकांना घरात अलगीकरण करण्यात आले होते. पैकी ९००४ लोकांचा चौदा दिवसांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे.११८७  लोक अजून होम क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत ७५ लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. पैकी ६७ लोकांचा चौदा दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून अजून ११ जण संस्थात्मक विलगीकरण आहेत. ग्रामस्तरीय विलगीकरण ६४८ व्यक्ती करण्यात आल्या होत्या पैकी ४२३ लोकांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे. अजून ८९ व्यक्ती विविध गावातील ग्रामस्तरीय विलगीकरण मध्ये आहेत.

                      तालुक्यात  केळघर,कुडाळ, कुसुंबी, सायगांव व बामणोली  अशी पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या पाचही आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी  उपलब्ध असणाऱ्या सुविधा द्वारे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना अंगणवाडी ,आशा सेविका यांची मोलाची साथ लाभली आहे.तर काही दिवस प्रशासनाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षकांनी सुद्धा आपली जबाबदारी पारपाडली आहे.

               सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला  तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अत्यंत तत्परतेने कार्यवाही केल्याने तसेच सपोनि निळकंठ राठोड व पीएसआय संतोष चामे यांच्या मार्गदर्शनाखाली ल चोख पोलीस बंदोबस्त व ग्रामदक्षता समित्यांच्या दक्षतेमुळे तालुक्यातील स्थानिक जनतेला कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पर्यंत होऊ शकला  नाही.साथ आटोक्यात असली तरीही धोका टळलेला नाही. त्यामुळे यापुढे ही लोकांनी गर्दी टाळणे, सोशल डिस्टेन्सींग पाळणे व मास्क वापरुन स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे.

               तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी बहुतांश जण मुंबई हुन आलेले आहेत. तर काही अन्य शहरातून आले आहेत.तालुक्यातील गावागावांत दक्षता समितीने बाहेरून येणारांची सोय ग्रामस्तरीय विलगीकरणात केली. त्याला या मुंबई कर भूमीपुत्रानी सहकार्य दिले.आता मुंबई हळुहळु पूर्वपदावर येऊ लागल्याने अनेक चाकरमानी पुन्हा मुंबईकडे निघाले आहेत. परंतु आता मुंबई कडे जाताना तेथील सोयी सुविधांची पूर्ण खात्री करून जावे. अन्यथा काही लोक मुंबईत जाऊन पुन्हा गावाकडे येत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पुन्हा स्थानिक यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता जनतेतून वर्तवली जात आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!