Skip to content

अमर मोहिते यांचे स्पर्धा परीक्षेतील यश आदर्शवत – नारायण जाधव .

बातमी शेयर करा :-

अमर मोहिते यांचे स्पर्धा परीक्षेतील यश आदर्शवत – नारायण जाधव .

सूर्यकांत जोशी कुडाळ- बुद्धीमत्तेला जिद्द आणि कठोर परिश्रमाची जोड मिळाल्यास असणाऱ्या  प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येते . बेलदार समाजातील अमर मोहिते यांनी स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून पोलीस उपअधीक्षक पदास गवसणी घातली आहे.त्यांचे हे यश समाजाच्या सर्व स्तरातील युवकांसाठी  आदर्शवत आहे .असे प्रतिपादन बेलदार समाजाचे युवा अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले.

           सातारा जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अमर मोहिते यांनी नुकत्याच झालेल्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत एन. टी.-ब प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली आहे. त्याबद्दल सातारा जिल्हा बेलदार समाजाच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष नारायण जाधव यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला. यावेळी जावली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते, जेष्ठपत्रकार रघुनाथ पार्टे, संदीप गाडवे उपस्थित होते.

         यावेळी डॉ . भगवानराव मोहिते म्हणाले,  अमर मोहिते हे बेलदार समाजातील असून परिस्थिती मुळे  शिक्षणापासून उपेक्षित असलेल्या समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे. कोणतेही यश मिळवण्यासाठी बुद्धी मत्तेला जिद्द व चिकाटी ची जोड मिळाल्यास जातपात, गरीब- श्रीमंत  अशी कोणतीही परिस्थिती आड येत नाही. अमर मोहिते यांचे हे यश समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे. 

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!