Skip to content

व्यसनाधीनतेमुळे पोटचे गोळेच झाले जन्मदात्यांचे वैरी     बलात्कार आणि चोरीच्या घटनांनी जावलीत खळबळ 

बातमी शेयर करा :-

“व्यसनाधीनतेमुळे उद्भवणारे कौटुंबिक व सामाजिक नुकसान टाळण्यासाठी व्यसनमुक्तीच्या उपाययोजनांची आवश्यकता आहे.”

सूर्यकांत जोशी कुडाळ -मुलगा झाला,वंशाला दिवा मिळाला म्हणून फटाक्यांची आतषबाजी व गाव जेवणावेळी घालून आनंदोत्सव साजरा करणाऱ्या जन्मदात्यांवर वयोवृद्ध अवस्थेत आपल्याच मुलांवर बलात्कार आणि चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्याची वेळ येते त्यावेळी नक्कीच सर्वांचीच म्हणे सुन्न होऊन जातात. दारूच्या व्यसनामुळे बरबाद होत असणारी पिढी उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य जन्मदात्यावर येत आहे. जावली तालुक्यात एकाच आठवड्यात पोटच्या मुलाने जन्मदात्या मातेवरच केलेला बलात्कार व आपल्या जन्मदात्याच्या घरातच चोरी करण्याचा प्रताप अशा  घडलेल्या दोन विविध घटनांनी जावली तालुका हादरला आहे.

              छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला  तालुका अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी जावली तालुक्याला आहे. त्याचबरोबर संत व वारकरी सांप्रदायाची ही उज्वल परंपरा या तालुक्याला लाभले आहे. डोंगरदर्‍यांनी व्यापलेला, घनदाट जंगल, सोयी सुविधांचा अभाव, अशा अनेक संकटावर मात करत जावली तालुक्याने  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेली आहे. ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, अशा शासनाच्या विविध योजनांत जावली तालुक्याने देश पातळीवर तसेच राज्यस्तरावर बक्षिसे मिळवली आहेत. दारू दुकान मुक्त तालुका असा लौकिक या तालुक्याला प्राप्त झाला. परंतु याच तालुक्यात काही मोजक्या अपप्रवृत्तीमुळे व काही सामाजिक दुष्प्रवृत्तीमुळे तालुक्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लागत आहे.

              व्यसनाधीनतेमुळे होत असलेले कौटुंबिक व सामाजिक नुकसान टाळणे शक्य व्हावे या उदात्त हेतूने व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून विलास बाबा जवळ, महिला संघटना  व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने जावली तालुक्यात सरकारमान्य दारू दुकाने बंद करण्यात आली. या आंदोलनाचा हेतू समाज सुधारावा  असा नक्कीच होता. परंतु ही चळवळ सामाजिक व राजकीय पाठबळाअभावी तात्कालीक ठरली. त्याला संबंधित शासकीय यंत्रनाही तितकेच जबाबदार आहे .

              25 ते 30 गावात एखाद असणार सरकार मान्य दारूचे दुकान बंद झालं. परंतु त्यानंतर गावोगाव गल्लीपोळात अवैध दारू विक्रीचा महापूरच आला. पैसे ज्यादा जात असली तरी दारूची जवळच उपलब्धता होऊ लागली. पैशाच्या हव्यासापोटी अनेक जण अशा अवैध धंद्यात उतरले.. दारू जुगार मटका यासारख्या अवैध व्यावसायिकांचा एक प्रकारे दबाव गटच तालुक्यात कार्यरत राहिला असलेले दिसून येते. अशा अवैध व्यवसायिकांना राजकीय वरदहस्त असल्याचाही आरोप अनेकदा केला गेला आहे.

              दारूच्या व्यसनाधीनतेमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे. आपली तलब भागवण्यासाठी तालुक्याच्या वेशीबाहेर जात येत असताना अपघातात जायबंदी झाले आहेत. तर व्यसनाच्या आहारी गेल्याने अकाली मृत्यू झालेल्या आपल्या मुलाला खांदा देण्याची वेळ  जन्मदात्या बापावर अनेकदा आली आहे.अशा प्रकारच्या आजवर घटना घडताना दिसून येत होते. परंतु या आठवड्यात मुलाने आपल्या जन्मदात्या मातेवर केलेला बलात्कार आणि आपल्या जन्मदात्याच्या घरातच चोरी करण्याची अशा घटना हा या व्यसनाधीनतेने गाठलेला कळसच म्हणावा लागेल.

  मुलांना घरातील संस्कार महत्वाचे -विलास जवळ (बाबा )

युवा पिढीवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत असलेले आघात,कुटुंबाचा डोलारा संभाळताना आई- वडीलांचे पाल्यांकडे झालेले दुर्लक्ष,व्यसनाधिनतेची सहज उपलब्ध होणारी साधने, गुरूजनांची मान मर्यादा न ठेवता विद्यार्थ्यांची वाढणारी गुन्हेगारी,समाजामध्ये अनेक घडणार्‍या घटनांचा बालमनावर होणारा परिणाम हे सध्या समाजामध्ये  घडणार्‍या अनेक घटनांना जबाबदार ठरत असून ज्या घरात संस्कार आहेतपरामणे अशीच मुले यापुढे टिकतील.जावली तालुक्यात सलग घडलेल्या दोन्ही घटना दुर्देवी असून प्रत्येक कुटुंबाने यातून बोध घेणे अत्यंत गरजेचे आहे.अशी प्रतिक्रिया व्यसनमुक्ती युवक संघांचे अध्यक्ष विलास जवळ यांनी व्यक्त केले.

                 शिक्षणाने समाज सुशिक्षित नक्कीच होतोय परंतु त्यासोबतच भावी पिढी सुसंस्कृत होणे तितकेच गरजेचे आहे. ही जबाबदारी  केवळ शैक्षणिक संस्थांची नसून  आई,वडील, कुटुंब, मित्र,नातेवाईक समाज,सामाजिकसंघटना, या सर्वांचीच आहे. याला अनेक कंगोरे आहेत. अनावश्यक व सहज पैसा उपलब्ध होणे. कुसंगत, मानसिक व आर्थिक ताण तणाव, कौटुंबिक व सामाजिक वाद विवाद असे अनेक कारणं आहेत. व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे. त्यामुळे भावी पिढीला योग्य मार्गावर आणण्यासाठी हर संभव अनेक प्रकारे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

               राजकीय स्वार्थ व तात्कालिक यश संपादन करण्यासाठी किंवा पैशाच्या जोरावर अपेक्षित काम करून घेण्यासाठी युवा पिढी बरबाद करण्याचे काम कोणी करत असेल तर त्यांना रोखण्याची जबाबदारी समाजालाच घ्यावी लागेल. आपला मुलगा जर चुकीचे पाऊल उचलत असेल तर त्याला वेळीच रोखण्याची जबाबदारी आई-वडिलांची आहे.

या युवा पिढीला आत्मनिर्भर रहावे -रविंद्र  परामणे 

आताच्या युवा पिढीने चांगल्या वाईटचा विचार स्वतः करावा लागेल. कोणत्याही व्यसनाच्या अधीन होता कामा नये.  जर माणूस कोणत्याही व्यसनाच्या अधीन झाला तर त्याचा शेवट वाईटच होणार. कोणतीही गोष्ट ठराविक मर्यादे पर्यंत योग्य असतें. मुलावर आई वडील व कुटुंबाचे नियंत्रण हवे. मोबाईल मुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. त्यातील काय घ्यायचे हे ज्याच त्याला ठरवावं लागणार आहे. जस कीर्तनानं समाज सुधारत नाही आणि तमाशा न बिघडत नाही अशी म्हण आहे. कुणाच्या सांगण्याने बदल घडेलच असे नाही.म्हणून  आपल्या आयुष्याच सोन करायचं की माती हे या पिढीला स्वतः ठरवावं लागेल.या आठवड्यात तालुक्यात घडलेल्या दोन्ही घटना दुर्दैवी आहेत असे मत जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र परामणे यांनी व्यक्त केले.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!