Skip to content

अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कुडाळची जलजीवन योजना रखडली :वीरेंद्र शिंदे यांचा आंदोलनाचा इशारा 

बातमी शेयर करा :-

 सूर्यकांत जोशी कुडाळ – फेब्रुवारी 2023 मध्ये जलजीवन अंतर्गत कुडाळ येथे दोन कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर असून कामाचा आदेशही झाला आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत ही योजना चालू झाली नाही. त्यामुळे नागरिकांचे गैरसोय होत आहे. योजनेचे काम चालू करण्याबाबत ग्रामपंचायतचे पत्र व ठराव देऊन सुद्धा योजना चालू होत नसेल तर या अधिकाऱ्यांच्या विरोधात लवकरच आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा कुडाळ गावाचे माजी सरपंच विरेंद्र शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे .

            कुडाळ हे  जावली तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. दिवसेंदिवस गावचा विस्तार वाढत आहे. सध्याचे असणारी पाणीपुरवठा योजना सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची असून या योजनेच्या माध्यमातून   गावामध्ये अजून काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.उदाहरणार्थ संपूर्ण बाजारपेठ, वारागडेआळी ,पंचशील नगर, अण्णाभाऊ साठे नगर, साईबाबा मंदिर, नागोबाचा माळ, पिंपळेश्वर कॉलनी बोरकॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, श्रीराम कॉलनी, हायस्कूल शाळे लगतचा भाग, शेख वाढा व लगतचा भाग बोराडे वस्ती, फुलेनगर, किरवे वस्ती शिंगारे वस्ती मेढा रोड इ.  पाणीपुरवठा होत नाही काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून लोकांची गैरसोय होत आहे

          कुडाळ येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप पाणीपुरवठा योजना कार्यान्वित भारत सरकार च्या या योजनेतून कुडाळ येथे हातपंपावर सौर ऊर्जा वर आधारित दुहेरी पंप बसवून 24 तास पाणीपुरवठा करण्यात येत असून नागरिकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे तसेच गावातील विविध हात पंपावर या योजना राबविण्यात याव्या यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वीरेंद्र शिंदे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यक्त केले. फेब्रुवारी 2023 रोजी जलजीवन अंतर्गत कुडाळमध्ये दोन कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर असून कामाचा आदेशही झाला आहे परंतु अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत ही योजना चालू झाली नाही त्यामुळे नागरिकांचे गैरसोय होत आहे. योजनेचे काम चालू करण्याबाबत ग्रामपंचायत चे पत्र व ठराव देऊनी योजना चालू होत नसेल तर या अधिकाऱ्यांच्या विरोधात लवकरच आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे विरेंद्र शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे..

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!