आ. शिवेंद्रसिंहराजेंना कुडाळकरांचा भक्कम पाठिंबा : सौरभ शिंदे ”कुडाळ गावात भाजपाचा घरोघरी प्रचार “


सूर्यकांत जोशी कुडाळ -आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर शिक्का मारून आपल्या आमदार बाबाराजेना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. आ. शिवेंदरसिंहराजेंच्या माध्यमातून गावात जात धर्म न पाहता सर्व समावेशक मोठया प्रमाणात विकास कामे केली असल्यामुळे यावेळी कुडाळ ग्रामस्थांचा,उस्फुर्त प्रतिसाद देत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार कुडाळ ग्रामस्थांनी केला
यावेळी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे, जावली बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र शिंदे, प्रतापगड कारखान्याचे माजी संचालक जितेंद्र शिंदे, कुडाळ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, व्हाईस चेअरमन काशिनाथ शेवते,सरपंच सौ.सुरेखा कुंभार,ग्रामपंचायतीचे सदस्य,सोसायटीचे संचालक यांच्यासह गावातील सर्व प्रमुख मंडळी,ग्रामस्थ,महिला उपस्थित होते.