कुडाळ -मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे भाजपा जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या विनंती वरून सातारा उपविभागीय अधिकारी श्री आशिष बारकूल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जावलीचे तहसीलदार श्री हणमंत कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली करहर ता. जावली येथे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरु असलेल्या या कार्यक्रमांतर्गत जवळपास 800 नागरिकांनी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेतला.यामध्ये तहसिल कार्यालयामार्फत दिले जाणारे विविध उत्पन्नाचे, रहिवाशी व जातींचे 210 दाखले दिले.सेतू विभागाकडून 42 उत्पन्नाचे तसेच 28 डोमासाईल दाखले दिले.तसेच पुरवठा विभागाकडून नवीन शिधा पत्रिका व दुबार नाव वाढवणे 49, नाव कमी करणे 28 लाभार्थ्यांना जागेवरच काम करून मिळाले. कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, ऍग्री स्टॅक जैविक शेती व महा डी बी टी असे एकूण 360 , सहकार विभागाकडून 20 शेतकऱ्यांना लाभ दिला.महावितरण करहर विभागाकडून 15 ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले.प्रार्थमिक आरोग्य केंद्र कुडाळ यांचे मार्फत 350 रुग्णांचे रक्त तपासणीकेली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण तसेच हिमोग्लोबिन ची तपासणी व इतर तपासण्या करून 13 नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची व ई कार्ड जागेवरच काढून देण्यात आलीत.वन विभागामार्फत 30 लाभार्थ्यांना वृक्ष लागवड, संगोपन, बांबू लागवड, संशोधन, तसेच वन्य जीवांकडून होणारे नुकसान भरपाई यांची माहिती देण्यात आली.पंचायत समिती मार्फत एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत लेक लाडकी योजना, पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांची गावोगावची यादी दाखवण्यात येऊन त्यांच्या मंजुरीचे पत्र येत्या दोन तीन दिवसात गावोगावी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.शासनाच्या विविध विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा एकाच छताखाली लाभ जागेवरच देण्यात आल्यामुळे आलेले नागरिक, लाभार्थी खुश होऊन जात होते. तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी तालुक्यातील सर्वच मांडला मध्ये अशा स्वरूचे कॅम्प सुरु ठेवणार असल्याचे सांगितले. भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी प्रशासनाचे स्वागत करून आभार व्यक्त केले. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) सागर माळेकर यांनी सुयोग्य नियोजन केले. या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड,उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब रुपनवर,जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी निकम सो, कनिष्ठ अभियंता महावितरण हर्षल शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव शिंदे,प्रदिप बेलोशे, नितिन गोळे, करहर सरपंच सोनाली यादव प्रदीप झेंडे उपसरपंच, मंडल अधिकारी करहर कोळी मॅडम, ग्राम महसूल अधिकारी करहर सागर माळेकर, महसूल अधिकारी काटवली प्रशांत माने तसेच गावोगावचे Spark पोलीस पाटील आणि करहर विभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here