जलसमाधीचा ढोंग थांबवा – आता सरळ राजकीय संन्यासच घ्या!” -वसंतराव मानकुमरेंवर संदीप पवार यांचे टीकास्त्र

कुडाळ / प्रतिनिधी – महू हातगेघर धरणग्रस्तांची संघर्ष समिती या अगोदर काम करत असून या समितीच्या पाठपुराव्यामुळेच धरणग्रस्तांची व कॅनलची कामे मार्गी लागली आहेत.येत्या पंधरा दिवसात महू हातगेघर धरणामधून शेतीत पाणी खळखळणार आहे या सर्व घडामोडीत वसंतराव मानकुमरे यांचा कोणताही सहभाग नसून केवळ आता श्रेय लाटण्यासाठी जलसमाधीचे ढोंग घेऊन आंदोलन जाहीर केले आहे.त्यांची ही स्टंटबाजी तालुक्यातील जनतेला चांगलीच माहित आहे तीस वर्षे हे सत्ता उपभोगत आहेत त्यावेळी त्यांना धरणग्रस्तांच्या व्यथा कळल्या नाहीत का ? आपल्या महत्त्वाच्या हिंदू सणा च्या वेळीच त्यांना जलसमाधी घेण्याचं जाहीर करून गणेश भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी आता जलसमाधी घेण्यापेक्षा राजकीय संन्यास घ्यावा अशी टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी केली
महू हातगेघर धरणा संदर्भात वसंतराव मान कुमरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंधरा दिवसात धरणाचे काम पूर्ण झाले नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख शांताराम कदम,समीर गोळे,उप तालुका प्रमुख राजेश माने, शहर प्रमुख संजय सुर्वे,श्रीरंग गलगले,प्रकाश परामणे,महेंद्र सपकाळ,सतीश पवार, अशोक परामणे,दत्तात्रय पोफळे,विक्रम तरडे, अमरदीप तरडे,महेश कदम,बाबू पवार,सचिन करंजेकर,दीपक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रसिद्धी पत्रकात संदीप पवार यांनी म्हंटले आहे की जावली तालुक्यातील जनतेच्या जखमा भरून काढायच्या सोडून, गेली तीस वर्षे धरणग्रस्तांच्या वेदना राजकारणासाठी वापरणारे माजी जि.प. सदस्य वसंत मानकुमरे ऊर्फ वसंतभाऊ आज पुन्हा आंदोलनाच्या गाजावाज्यात उतरले आहेत.महु हातगेघर धरणाच्या पायाभरणीपासून आतापर्यंत —शंभर टक्के पुनर्वसन झाले नाही,शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचले नाही,कालव्याचा प्रश्न सुटला नाही,धरणग्रस्तांच्या पिढ्यानपिढ्या उध्वस्त झाल्या,पण वसंतभाऊ मात्र सत्ताधाऱ्यांच्या छायेत सुखाने घोटाळे आणि सत्तेचा मेवा उपभोगत राहिले होते २५ वर्षे जिल्हा परिषदेवर बसून, सत्तेत राहून, नेत्यांची खुर्ची उबवून धरणग्रस्तांच्या नावावर राजकारण केले, पण आजपर्यंत एकही प्रश्न सोडवला नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अचानक आता आंदोलनाची आठवण का झाली?
खरं तर जावलीच्या लोकांना माहिती आहे –दोन वर्षांपूर्वी रामवाडीत उभी राहिलेली “कृती समिती” आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे डावा कालवा पूर्ण झाला.त्या लढ्यात वसंतभाऊंचा सहभाग शून्य टक्के होता.प्रशासनावर दबाव आणण्यासाठी त्यांनी कधी पुढाकार घेतला नाही.म्हणजे जनतेसाठी नव्हे, तर स्वतःच्या खुर्चीसाठी आंदोलन हा त्यांचा जुना डावपेच आहे जावलीची जनता स्पष्ट सांगते आहे की सत्ता भोगताना तुम्हाला धरणग्रस्त आठवले नाहीत, मग आज आंदोलनाची नौटंकी करून आमची दिशाभूल करू नका.वसंतभाऊ, तुमचं नेतृत्व कुचकामी, तुमचं आंदोलन ढोंगी, आणि तुमची राजकारणाची भूक आता उघड झाली आहे. धरणग्रस्तांच्या फलटण तालुक्यातल्या जमिनी विकण्यामध्ये व मलिदा खाण्यामध्ये नक्की कोणाचा सहभाग होता ज्यांच्या जमिनीतील विकायच्या आहेत त्यांचाच जमिनीच्या वाटपांचे आदेश प्रशासनातून कसे काय निघत होते हे सगळे जनता जाणून आहे म्हणूनच जनतेची मागणी आहे की जलसमाधी नको, थेट राजकीय संन्यासच घ्या.
माननीय मंत्री महोदय ना.शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वात जावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत आमच्या शिवेंद्रराजेंच्या कार्याचा गौरव स्वतः भारताचे सर्वाच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबाराजेंचा अत्यंत कार्य कुशल मंत्री म्हणून गौरव होत असताना मग वसंतभाऊंना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? त्यांचे आंदोलन म्हणजे अशा कार्य कुशल नेतृत्वाला अडचणीत आणण्यासाठी आहे का ? की त्यांचा प्रश्न जनतेचा नसून फक्त स्वतःच्या राजकीय पुनरागमनाचा आहे? असा सवाल ही पवार यांनी केला आहे