Skip to content

मेढा बस डेपोचे कुडाळ मधील वाहक कैलास सासवडे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक:

बातमी शेयर करा :-

दीड लाखाचा मुद्देमाल असलेली बॅग केली परत


मेढा-सातारा या बसने प्रवास करताना बसमध्ये विसरलेली प्रवाशाची बॅग वाहक कैलास सासवडे यांनी प्रवाशास प्रामाणिकपणे परत केली. औंध येथील रहिवासी सौ.सविता रणदिवे पतीसमवेत मेढा येथील कुसुंबीच्या काळूबाईचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. परतीच्या प्रवासात त्यांनी मेढा-सातारा या बसने प्रवास केला.सातारा येथे उतरल्यानंतर बॅग गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सातारा स्थानक प्रमुख राहुल शिंगाडे यांच्याशी संपर्क साधला.शिंगाडे यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाकडून गाडीचे वाहक आणि चालक यांचे बॅच नंबर घेवून मेढा आगार प्रमुखांची संपर्क साधला. वाहक कैलास सासवडे यांनी बस आगारामध्ये जमा करताना तपासणीच्या वेळी बॅग बसच्या बाकड्याखाली आढळली असे सांगत सदर बॅग त्यांच्या ताब्यात सुखरूप असल्याचे सांगितले.बॅगमध्ये दोन मोबाईल, एक सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम असे मिळून एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल होता. बॅग वाहक कैलास सासवडे यांनी सातारा स्थानक प्रमुख राहुल शिंगाडे यांच्या उपस्थितीत प्रवाशास सुपूर्द केली. यावेळी श्री.व सौ. रणदिवे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सातारा स्थानक प्रमुख राहुल शिंगाडे व वाहक कैलास सासवडे यांच्या रूपाने देवच आमच्यासाठी धावून आला,अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वाहक कैलास सासवडे व सातारा स्थानकप्रमुख राहुल शिंगाडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!