बांधकाम अभियंता आणि ठेकेदार यांच्या संगनमताने डांबरीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची – संदीप पवार


सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत होत असणाऱ्या डांबरीकरणाच्या कामात मोठा झोल होत आहे. कामाच्या निवीदेतील तरतुदीनुसार डांबर न वापरता बांधकाम अभियंता व ठेकेदार संगणमताने वेगळ्या पद्धतीचे डांबर वापरून डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करत आहेत. याबाबत संबंधित विभागाने चौकशी करून दोषींच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग मार्फत असंख्य डांबरीकरणाची कामे गावोगावी प्रत्येक तालुक्यात करण्यात येत असतात या कामाच्या निविदा भरतेवेळी निविदेमध्ये असलेली महत्त्वाची अट म्हणजे डांबरीकरणाच्या कामासाठी हॉट मिक्स प्लांट स्वतःच्या मालकीचा अथवा भाड्याने घेणे ही निविदा भरतेवेळी महत्त्वाची अट आहे त्यानंतरच सदरच्या कामाच्या कार्यारंभ आदेश देण्यात येतो हॉट मिक्स प्लॅनच्या साह्याने काम केल्याने सदरच्या डांबरीकरणाचे काम हे दर्जेदार होत असते म्हणूनच ही अट आहे परंतु दुर्दैवाने आपल्या सातारा जिल्ह्यातील बांधकाम विभागामार्फत करणाऱ्या डांबरीकरणाची कामे ही जुन्या मिक्सर पद्धतीनेच केली जातात त्यामध्ये शाखा अभियंता व उपअभियंता यांच्याच कृपेने हा सर्व प्रकार होत आहे असे दिसत आहे वास्तविक पाहता हॉट मिक्स प्लांट च्या पद्धतीने सदरचे काम करण्याचा ठेकेदारांना डीएसआर दिलेला असताना सुद्धा टक्केवारी करिता कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियंता हे मिक्सरच्या साह्याने कार्पेरेट चा माल तयार करीत काम करीत असतात त्यामुळे बांधकाम विभागाची कामे ही निकृष्ट दर्जाची होत चाललेली आहेत .याच्यावर त्वरित कारवाई करून हॉट मिक्स स्टॅन्ड वरून कामे करून घेण्यात यावी व जनतेला उत्तम दर्जाची कामे करून मिळतील ही दक्षता घ्यावी अन्यथा ज्या ठेकेदारांनी मिक्सरवर कामे केली आहेत त्यांचे कार्पेटच्या दरामध्ये Redusing रेट करावा त्याचबरोबर निविदा प्रक्रियेमध्ये अट असताना सुद्धा त्या गोष्टीकडे नजर अंदाज करणाऱ्या कनिष्ठ अभियंता .उपअभियंता यांच्यावर योग्य ती चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी संदीप पवार यांनी या निवेदनात केली आहे.