ई केवायसी न केल्यास रेशनींग कार्ड होणार रद्द : 30 मार्च अंतिम मुदत :

सूर्यकांत जोशी कुडाळ – सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या रेशनिंग कार्ड चे ई केवायसी करणे बंधनकारक आहे. 30 मार्च पर्यंत ई केवायसी न केल्यास रेशनिंग कार्ड व त्या आधारे मिळणारे धान्य बंद होणार असल्याची माहिती स्वस्त धान्य वितरकांकडून देण्यात येत आहे. ही केवायसी करण्यासाठी आता मोबाईल ॲपही उपलब्ध असून दिलेल्या मुदतीत सर्वांनी केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व NFSA लाभार्थ्या साठी मेरा ई-केवायसी ॲप आता कार्यरत आहे. आता NFSA लाभार्थी रास्त भाव दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे KYC पूर्ण करू शकतात. प्रक्रिया त्रासमुक्त आहे आणि चेहरा प्रमाणीकरण वापरते.लाभार्थ्यांनी खालील दोन ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे.1. मेरा ई-केवायसी ॲप2. आधार फेस आरडी सेवा ॲपखालील लिंक्सवरून ॲप्स डाउनलोड करावीत.
🔗 मेरा ई-केवायसी मोबाइल ॲप
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth
🔗 आधार फेस आरडी सेवा ॲप
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd