संपूर्ण राज्याची जबाबदारी असली तरी मतदारसंघासाठी कायम तत्पर राहणार – ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले

विकास कामांना नेहमीच प्राधान्य | कुडाळ येथे रस्ते, लाईट डीपी, सभा मंडप मंजूर – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
सूर्यकांत जोशी कुडाळ:

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि साताऱ्याचे लोकप्रतिनिधी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले की, “मंत्रीमंडळातील जबाबदाऱ्या कितीही महत्त्वाच्या असल्या तरी माझ्या मतदारसंघातील विकास हे माझं सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे.” ते जावली तालुक्यातील गोपाळपंताची वाडी – कुडाळ येथे पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
गोपाळपंताची वाडी -कुडाळ,तालुका जावली येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी नामदार भोसले बोलत होते.या कार्यक्रमास प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र शिंदे, कुडाळ सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती हभ प सुहास गिरी, जितेंद्र शिंदे, वीरेंद्र शिंदे, भाऊराव शेवते, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,
मतदारसंघातील विकासाला गती : रस्ते, लाईट डीपी व सभा मंडप मंजूर
ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले पुढे म्हणाले, ” ग्रामविकास योजना, रस्ते विकास योजना, तसेच नवीन लाईट DP योजना यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. कुडाळ ते गोपाळपंताची वाडी रस्ता, गावातील नवीन लाईट डीपी, तसेच सभा मंडप योजना ही विकासकामे ग्रामस्थांच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण केली जातील.”
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
प्रारंभी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात आला.महेश बारटक्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी गोपाळपंताच्या वाडीचे ग्रामस्थ सयाजी कदम, संतोष मोरे, अनिल शिर्के, वसंत नवले, मुरलीधर कदम, शिवाजी शिंदे, चंद्रकांत मोरे, सर्जेराव कदम, ह.भ.प, रघुनाथ मर्ढेकर महाराज, बाळासाहेब किरवे यांच्यासह ग्रामस्थ,महिला युवक यांनी परिश्रम घेतले .
#सरकारीयोजना #ग्रामविकास #रस्तेविकास #साताराविकास #शिवेंद्रसिंहराजेभोसले #जावलीतालुका #मंत्रीबांधकाम #लाईट_DP #सभामंडप_योजना