Skip to content

करंजे तर्फ मेढा येथे दि 30 रोजी श्री गणेश मंदिर उद्घाटन सोहळा व तालुका स्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन*

बातमी शेयर करा :-

* सूर्यकांत जोशी कुडाळ – करंजे तर्फ मेढा तालुका जावली येथे श्री गणेश मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता तालुकास्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील संत परंपरा जपली जावी व खेड्यातील भजनी मंडळीना प्रोत्साहित करण्यासाठी, भजनी कला तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात मजबूत करण्यासाठी कै नंदकुमार ओंबळे,कै.शंकरराव पवार, कै,श्रीपाद जोशी यांनी येथील देवस्थानसाठी खुप मोठे योगदान दिले असून त्यांच्या स्मरणार्थ सदर भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

सदर भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपये ७७७७ *कै नंदकुमार ओंबळे यांचे स्मरणार्थ त्यांचे कुंटूबियाचे वतीने देण्यात येणार आहे*द्वितीय क्रमांक रुपये ५५५५ कै. जगन्नाथ पांडूरंग धनावडे यांचे स्मरणार्थ त्यांचे कुंटुबियाचे वतीने देण्यात येणार आहे*.तृतीय क्रमांक :रुपये ३३३३ स्वर्गीय सौ.शुभांगी अजित साखरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटूंबियाचे वतीने देण्यात येणार आहे.चतुर्थ क्रमांक : रुपये २२२२संपत कुंडलिका धनावडे.पाचवा क्रमांक : रुपये १५५१ श्री.विजय मारूती धनवडे सहावा क्रमांक : रुपये १ ००१ वसंतराव भिकू चिकणे यांच्या कडून देण्यात येणार आहे.सर्व चषक व सन्मानपत्र श्री गणेश देवस्थान यांचे वतीने देण्यात येणार आहेत.उत्तेजनार्थ प्रथम १)क्रमांक :९९९ *संतोष शंकर विभूते*२) द्वितीय : ७७७ *सुरेश नामदेव धनावडे*३) तृतीय : ५५५ *श्रीरंग कोडीबा धनावडे*वैयक्तिक बक्षीसे :१) उत्कृष्ट संघ : ५०१ *गणपत गेणू धनावडे*२) उत्कृष्ट गायक : ५०१ *दत्ता देशमुख यांचे कडून*३) उत्कृष्ट तबला वादक : ५०१ *चेतन कालीदास ठोंबरे*४) उत्कृष्ट पक्वाज वादक : ५०१*विनल देशमुख यांचेकडून*५) उत्कृष्ट हार्मोनियमवादक ५०१*भगवान ज्ञानेश्वर धनावडे यांचे स्मरणार्थ गणेश भगवान धनावडे*६) उत्कृष्ट श्रोता : ५०१ *बजरंग गेणू धनावडे यांचे* *स्मरणार्थ संतोष बजरंग धनावडे*७) उत्कृष्ट टाळ वादक :कृष्णा मारूती धनावडे यांचे स्मरणार्थ श्रीकांत वसंत धनावडे यांचेवतीने. देण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भजन मंडळांनी श्री.अजित साखरे मोबाईल नं.९४२१ १२१२२८,श्री.दत्तात्रय देशमुख मोबाईल नं.९४२३२६४३४५* यांचेशी त्वरित संपर्क साधावा.

श्री गणेश मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा तसेच भजन स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!