अंबिका नगर- शेते येथील विकास कामांना प्राधान्य – नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले: अंबिका नगर शेते येथे सिकोत्तर देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न
May 17, 2025/


कुडाळ – जावली तालुक्यातील शेते येथील अंबिका नगर येथे आवश्यक विकास कामे करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले.
अंबिका नगर शेते येथील सिकोत्तर देवीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, जावली तालुका भाजपचे अध्यक्ष संदीप परामणे, अमोल भिलारे विकास धोंडे, अशोक भिलारे,मानसिंग भिलारे, यशवंत मेंगळे, नारायण काळे, नितीन मेंगळे, निलेश साळुंखे,नाना साळुंखे,बाळू मेंगळे,उपस्थित होते.
[the_ad id="4264"]