भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून जावळीचे पूर्व विभाग मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांच्या कार्याचे कौतुक: स्मृती चिन्ह व टॅब बक्षीस रूपात देऊन पुढील कार्यास दिल्या


सूर्यकांत जोशी कुडाळ – महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेशान्वये जावली तालुक्यातील पूर्व विभागाचे मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांची निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर संदीप प्राण्यांनी नियोजन पद्धतीने कामाचा धडाका लावून पक्षाच्या आदेशानुसार काम सुरु करून पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न सुरू केले आहेत या कामाचे दखल भाजपाचे राज्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली आहे. ज्या कामाची पोहोच म्हणून परामणे यांना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व संगणक टॅब भेट म्हणून देण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कामाची पोच पावती तसेच पुढील कार्य प्रेरणा यासाठी पक्ष अध्यक्ष यांनी नामदार बाबाराजे यांनी संदीप माझ्यावर टाकलेली जबाबदारी मोठ्या विश्वासाने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आपणास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे , जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे , प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा, जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे,तसेच विविध सेल अध्यक्ष व सौ मीनाक्षी बेलोशे,सचिन मदने,मोहन शिंदे, समीर भाई आतार, विकास धोंडे श्रीकांत मुसळे,संतोष महामूलकर, अजय पाडले ,दिनेश गायकवाड, सर्व बूथ प्रमुख आणि असंख्य बाबाराजे प्रेमी आणि सहकारी या सर्वांचे सहकार्य आहे आपल्या आशीर्वाद आणि प्रेमामुळेच आम्ही आज इथवर आहोत याची जाण नक्कीच असेल आपण सर्वाचे प्रेम असावे काही चूक असेल तर नक्की सांगा आपला आदर असेल अशी प्रतिक्रिया परामणे यांनी व्यक्त केली आहे.