सावधान!! महू धरण भरले हो……कुडाळी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

: महू धरण भरले :सांडव्या वरून होणार पाण्याचा विसर्ग

सूर्यकांत जोशी कुडाळ – मे महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कुडाळी नदीवरील महू धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे कुडाळी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून कुडाळी नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपविभागीय अधिकारी रा पा निकम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. महू धरणाच्या सांडव्यावरून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे त्यामुळे कुडाळी नदीकाठी येणाऱ्या करहर,आखाडे,हुमगाव,बामनोली,शेते कुडाळ इत्यादी गावातील नदीकाठी असणाऱ्या लोकांनी तसेच नदीपात्रातून जाता येता विशेष खबरदारी घ्यावी असेही आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.