सायघर येथे रविवारी भव्य विकास परिषद व नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नागरी सत्कार समारंभाचे आयोजन

सूर्यकांत जोशी कुडाळ – सायघर तालुका जावली येथे रविवार दिनांक 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य विकास परिषद दोन व ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याप्रसंगी विविध विकास कामांचे भूमिपूजन व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. यावेळी तीर्थक्षेत्र प्रतिपंढरपूर करहर येथील आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या महिलांना विशेष साडी वाटप मंत्री महोदयांच्या हस्ते या कार्यक्रमासाठी जावली तालुक्यातील तमाम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सहा गाव पंचक्रोशी व सह्याद्री डोंगरी विकास मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,महाराष्ट्र राज्य मंत्रालय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष आर.के.धनावडे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर Electricity चेअरमन सौरभ शिंदे, डीएमके जावली सहकारी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे, जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, जावली तालुका भारतीय जनता पक्ष मंडलाध्यक्ष संदीप परामणे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी विविध गावचे सरपंच उपसरपंच इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आले आहे.